शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:06 IST

नुकसानभरपाई कोण देणार? : नालासोपारा पश्चिमेकडील पाणी ओसरेना

नालासोपारा : शनिवारी रात्रभर नालासोपारा शहराला पावसाने झोडपल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाने करोडो रुपये खर्च करून केलेली गटारे, नाले व्यवस्थित साफ करून घेतले असते किंवा पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना केली असती तर या पावसाळ्यात नालासोपारकरांना दुसऱ्यांदा या परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते.लोकप्रतिनिधींनी दक्षता न घेतल्याने प्रत्येकाच्या प्रभागात पावसाचे पाणी साचले. या पावसामुळे जे नुकसान झाले आहे ती नुकसानभरपाई कोण देणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पूर्वेकडील पाणी ओसरले असले तरी पश्चिमेकडील अनेक परिसरात आताही मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी गुडघाभर पाणी होते.कोणतीही सुविधा करण्यात आली नाहीवसई तालुक्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने ५०० ते ६०० लोकांचे स्थलांतर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, एनडीआरएफची टीम, पालघर पोलीस, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अिग्नशामक दलाच्या जवानांनी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत केले होते पण नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर, हनुमान नगर, एस टी डेपो रोड, पाटणकर पार्क याठिकाणी परिस्थिती पाहण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी साधा फिरकलाही नाही. पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांनी रविवारची रात्र अंधारात इमारतीच्या टेरेसवर काढली पण महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थेचे अधिकारी, कर्मचारी, निवडणूकीत मते मागणारे लोकप्रतिनिधी साधे फिरकले सुद्धा नाही यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.वीजपुरवठा सुरळीतपणे......नालासोपारा शहरात पाणी साचल्याने अनेक परिसरातील वीज रविवारी पहाटे घालवण्यात आली होती. तर ज्या परिसरातील पावसाचे पाणी ओसरले होते त्या परिसरात रविवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत केला होता. पश्चिमेकडील अनेक परिसरात पाण्यामुळे रविवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता पण सोमवारी सकाळी महावितरणचे वायरमन, कर्मचारी ज्या ज्या परिसरात साचलेले पाणी ओसरले त्या त्या परिसरात जाऊन बघितल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करत होते.सदर पावसाच्या पाण्याचा फ्लो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. पावसाळ्यापूर्वी अलकापुरी येथून पाईप टाकण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील परिसरात जेथून पाणी जाते ते फुल असल्याने ते कमी झाल्यावर पश्चिमेकडील परिसरातील पावसाचे पाणी कमी होईल.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :floodपूर