शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

चिंतामण वनगा : जमिनीवर पाय असणारा इमानदार नेता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:21 IST

दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीला १९८३ ते ८६ या काळामध्ये जव्हार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष होते. पुढे ठाणे प्रगती प्रतिष्ठानचे खजिनदार, मोखाड्यातील सह्याद्री आदिवासी बहुविध सेवासंघ देवबंधचे सचिव, तलासरी वनवासी विकास प्रकल्पाचे उपाध्यक्ष, तलासरीतील विहिपच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. या काळात त्यांचा जनसंपर्क वाढला होता.

पालघर/डहाणू : दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीला १९८३ ते ८६ या काळामध्ये जव्हार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष होते. पुढे ठाणे प्रगती प्रतिष्ठानचे खजिनदार, मोखाड्यातील सह्याद्री आदिवासी बहुविध सेवासंघ देवबंधचे सचिव, तलासरी वनवासी विकास प्रकल्पाचे उपाध्यक्ष, तलासरीतील विहिपच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. या काळात त्यांचा जनसंपर्क वाढला होता.विक्र मगड तालुक्यातील दादडे आश्रमशाळेचे खजिनदार १९९२ ते ९७ या काळामध्ये ठाणे जनता सहकारी बँकेचे संचालक, तलासरीतील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, दादरा-नगर हवेली सहकारी साखर कारखाना संचालक, महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष याच बरोबरीने वनगा यांनी सामाजिक सांस्कृतिक संघटनांमध्येही विविध पदे भूषिवली होती. वनवासी कल्याण केंद्र व प्रगती प्रतिष्ठान आदी संस्थांसाठी त्यांनी केलेली भरीव कामगिरी केली. तर तीन वेळा खासदार म्हणून त्यांना मतदारांनी विजयी केले होते. त्यांनी कधीही मंत्रिपदाची अभिलाषा बाळगली नसली तरी सध्या त्यांच्या मागण्याकडे वरिष्ठ पातळी वरून दुर्लक्ष केले जात असल्याची चीड ते व्यक्त करीत होते. रेल्वे संदर्भातील डहाणू-वसई संदर्भातील मागण्या, विक्र मगड-जव्हार-नाशिक रेल्वे मार्ग व्हावा ह्यासाठी ते विशेष आग्रही होते. राजकारणात त्यांनी कधीही स्वत:ची घराणेशाही लादली नाही.जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न त्यांनी काँग्रेस, भाजप राजवटीत असलेल्या सुरेश कलमाडी व रामनाईक यांच्याकडे पोट तिडकीने मांडून विरार उपनगरीय क्षेत्र डहाणू पर्यंत वाढवून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. लोकल सेवा डहाणू पर्यंत वाढविण्यास राम नाईक यांच्या कारिकर्दीत मोलाचा वाटा असून डहाणू-तलासरी तालुक्यातील मच्छीमार व आदिवासी खलाशी गुजरातच्या बोटीतून मासेमारी करत असताना त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत अटक झालेल्या १०० हुन अधिक आदिवासी व इतर लोकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पाकिस्तानी सरकारकडे पाठपुरावा करून सुटका करुन घेतली.सूर्या प्रकल्पातील डहाणू, विक्र मगड, पालघर तालुक्यातील शेती-सिंचनासाठी राखीव पाणी वसई-विरार-भार्इंदर कडे वळविण्यास त्यांचा तीव्र विरोध राहिला व त्यासाठी ते स्वपक्षा बरोबर वेळोवेळी भांडले. वाढवण बंदाराबाबत त्यांनी खासदार म्हणून तीव्र विरोध केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात त्यांनी विरोध दर्शवत या प्रकल्पाच्या कामाची फाईल एका अधिकाºयावर भिरकावली होती. तलासरीत असलेल्या ४४० हेक्टर शासकीय जमिनीवर एमआयडीसी उभारण्याबाबत ते नाखूष होते, ह्या जमिनी पुन्हा शेतकºयांना परत मिळाव्यात ह्या बाबत त्यांनी आंदोलने केली होती. त्यांनी पाहिलेल्या डहाणू-जव्हार-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. जिल्ह्यातील खजुरी (सिंदी) झाडापासून तयार होणारी नीरा हा रोजगाराचा मार्ग असू शकेल या बाबत ते ठाम होते.राजकीय कारकीर्दपालघर जिल्ह्यातून दोन वेळा खासदार व एक वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. भाजपचे खासदार म्हणून त्यांना ठाणे पालघर नव्हे तर थेट दिल्लीतील संसद भवनातही त्यांचा नावलौकिक होता. संसदेत ते राजकारणातील संत माणूस व चिंतामणी या नावाने ओळखले जात होते.भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष असताना १९९६ साली ११ व्या लोकसभेसाठी त्यांनी निवडणूक लढविली व ते निवडून आले. १९९८ च्या १२ व्या लोकसभा मुदतपूर्व निवडणुकीत वनगा पराभूत झाले. मात्र, पुन्हा १९९९ च्या १३ व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना खासदार म्हणून संसदेत पाठविले. पुढे २००४ च्या लोकसभे दरम्यानच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला.मात्र, २००९ साली त्यांनी विक्र मगड मतदार संघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवली व तेथे जनतेने त्यांच्यावर ठाम विश्वास दाखवत त्याना कौल दिला. अलीकडच्या २०१४ च्या पालघर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली.त्यावेळी प्रतिस्पर्धी बळीराम जाधव यांचा खासदार वनगा यांनी २ लाख ३९ हजार मतांनी पराभव केला व ते पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले.राजकीय व सामाजिक जीवनाची सुरु वात आम्ही एकत्रित केली. आज त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील जनतेच्या प्राश्नांसाठी सैदव जागरूक असणारा लोकप्रतिनिधी आपण गमावला असून आपल्यावर असणारे भावाचे छात्र हरपले आहे.-विष्णू सवरा, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्रीवनगा यांची विचारसरणी आरएसएसची जरी असली तरी ते एक व्यक्ती म्हणून मनमिळाऊ तसेच सेवाभावी वृत्ती, निष्कलंक व्यक्तिमत्व होते. पक्षाविराहित काम करण्याचा त्यांनी सदोदित प्रयत्न केला. अजातशत्रू म्हणून ते सर्वसामान्यांमध्ये वावरले. त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाची मोठी हानी झाले आहे.- राजेंद्र गावीत, माजी राज्यमंत्रीजेंटलमन माणूस व अतिसभ्य ख्याती असलेला एक खासदार जिल्ह्याने गमावला ही दु:खद घटना आहे. आम्ही पक्षपातळवर लढलो तरी त्यांचा आदर कायम राहिला. त्यांनी आपले स्वच्छ चारित्र्य कायम जोपासले आहे.- आनंद ठाकूर, आमदार, विधान परिषदएक संवेदनशील, अभ्यासू आण प्रामाणिक लोकप्रतिनिधी हरपला. पालघर मतदार संघातील प्रश्नांची त्यांना जाण होती. कुपोषण, सुर्या प्रकल्प पाणी प्रश्न, दमनगंगा, पिंजाळ पाण्याचा प्रश्न अशा विविध प्रश्नात त्यांनी स्थानिक आदिवासी आणि जनतेच्या बाजूनी भूमिका घेतली. जिल्हा निर्मितीनंतर पालघर जिल्हा पत्रकार संघासोबत झालेल्या पहिल्याच वार्तालापात त्यांनी नवीन जिल्ह्याच्या विकासाची काय दिशा असेल याचे चित्र समोर ठेवले होते. त्यांच्या अकाली जाण्याने पालघर लोकसभा मतदार संघ व पालघर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे.- रमाकांत पाटील,अध्यक्ष, पालघर जिल्हा पत्रकार संघहाडामांसाचा,स्वच्छ प्रतिमेचा,स्वच्छ कारभाराचा, राजकारणापेक्षा समाजकारणाची जाण असलेला नेता गेल्याने आदिवासी-बहुजन समाजाचे नेतृत्व करणारा स्पष्टवक्ता गेल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.-जितेंद्र राऊळ, सुर्या पाणी बचाव समितीया जिल्ह्यातील निष्कलंक नेता तसेच आदिवासी भागातील स्थानिक प्रश्नांची जाण असलेले तडफदार नेतृत्व व झुंजार पर्व शमले.- प्रकाश लवेकर, जिल्हाध्यक्ष,जनता दलजिल्ह्याचे आदर्श नेतृत्व हरपले असून त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातील न भरून निघणारी हानी झाली आहे.- सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीनिस्वार्थपणे समाजकारण व राजकारण करणारा निरागस खासदार या जिल्ह्याने हरपला असून त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.- केदार काळे, काँग्रेस, जिल्हाध्यक्ष,वनगा यांचे अनपेक्षित जाणे धक्कादायक वाटले. राजकीय सामाजिक कार्य प्रामाणिकपणे तसेच विचार परखडपणे मांडणारे ते कार्यकर्ते होत. त्यांच्या नेतृत्वाचा पुढचा प्रवास आशादायक वाटत असताना त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले. - नवनीतभाई शहा, माजी आमदारखासदार साहेबांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी उणीव निर्माण झाली आहे. त्यांनी दाखिवलेल्या मार्गाचा अवलंब करून प्रगत पालघरचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. - विजय खरपडे, अध्यक्ष, जिल्हा परिषद (पालघर)मनमिळाऊ, सर्वाना बरोबरीने घेऊन चालणारे, सुसंस्कृत असणारे, शासन-प्रशासनाकडे जिल्ह्यातील प्रश्न हिरीरीने मांडणारे व आमचे जवळचे मित्र खासदार गेल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.- हितेंद्र ठाकूर, बविआ, आमदारमच्छीमारांच्या प्रश्नाबाबत दिल्ली येथे आंदोलने करताना ते नेहमीच मच्छीमारांच्या सोबत असायचे. पंतप्रधान, कृषी मंत्री ह्यांच्या कडे आमच्या मागण्यांचा पाठपुरावा ते करीत असल्याने ‘मच्छिमारांचे मित्र’ हरपल्याने आमचे नुकसान झाले आहे.- नरेंद्र पाटील. अध्यक्ष,एनएफएफ संघटनासत्ताधारी असूनही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपल्या स्वपक्षाच्या विरोधात उभे राहून प्रश्नाला वाचा फोडणारे एक निष्कलंक, निस्वार्थी व्यक्तिमत्व हरपल्याने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे.-राजेश शहा, जिल्हाध्यक्ष शिवसेना.

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगाBJPभाजपा