विरार : मांजरीमुळे होत असलेल्या त्रासाला वैतागलेल्या एका व्यक्तीने मांजरीच्या मालकास चाकूचे वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री विरारमध्ये घडली आहे.विरार पूर्वेकडील कारगिर नगरात सम्राट अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र मोरे यांनी मांजर पाळली. तिचा उपद्रव होत असल्याने त्यांचे शेजारी दिनेश बागवे वैतागले होते. त्यातच बुधवारी रात्री मांजरीने बागवे यांच्या घराबाहेर घाण केली. त्यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बागवेंनी चाकूने मोरेंवर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून पोलिसांनी बागवेंवर गुन्हा दाखल केला आहे.
मांजरीला वैतागून शेजा-यावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 05:14 IST