कॅथॉलिक बँकेने धर्मगुरुंना सदस्यत्व नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:06 AM2017-11-22T03:06:29+5:302017-11-22T03:06:38+5:30

धर्मगुरुंना सभासदत्व देण्याचे बँकेचे धोरण नाही, असे लेखी कळवून बॅसीन कॅथॉलिक बंँकेने निवृत्त धर्मगुुरु आणि समाजशुद्धी अभियानाचे प्रमुख फा. मायकलजी यांना बँकेचे सदस्यत्व नाकारले.

Catholic bank denied membership to religious leaders | कॅथॉलिक बँकेने धर्मगुरुंना सदस्यत्व नाकारले

कॅथॉलिक बँकेने धर्मगुरुंना सदस्यत्व नाकारले

googlenewsNext

शशी करपे
वसई : धर्मगुरुंना सभासदत्व देण्याचे बँकेचे धोरण नाही, असे लेखी कळवून बॅसीन कॅथॉलिक बंँकेने निवृत्त धर्मगुुरु आणि समाजशुद्धी अभियानाचे प्रमुख फा. मायकलजी यांना बँकेचे सदस्यत्व नाकारले. त्यामुळे एका धर्मगुरुनेच स्थापन केलेली आणि शंभरावे वर्ष साजरे करीत असलेली बॅसीन कॅथॉलिक बँक नव्या वादात सापडली आहे.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष सचिन परेरा यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय झाल्याने वादात सापडलेली बॅसीन कॅथॉलिक बंँक यामुळे नव्या वादात अडकली आहे. बॅँकेचे सभासदत्व मिळावे यासाठी फा. मायकल जी यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये रितसर कागदपत्रे आणि दीड हजार रुपये जमा करून अर्ज केला होता. मात्र, बँकेच्या मॅनेजरने त्यांना सभासदत्व नाकारले असल्याचे लेखी उत्तर देऊन त्यांचा अर्ज निकाली काढला आहे. धर्मगुरुंना बँकेचे सभासदत्व देण्याविषयी बँकेचे धोरण नाही. तसेच बँकेच्या उपविधीत तशी तरतूदही नाही. यास्तव बँक धर्मगुरुंना सभासदत्व देऊ शकत नाही, असे पत्रात म्हटले आहे.
सहकार नियमात धर्मगुरुंना सभासदत्व नाकारण्याची कुठलीच तरतूद नसल्याने बँकेने चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप फा. मायकल जी यांनी केला आहे.
सभासदत्वाचा निर्णय सहकार नियमांनुसार बोर्ड मिटींगमध्ये ठरतो, शाखेत नाही. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सहकार कायद्यात माणसा-माणसात भेदभाव करण्याचा उल्लेख आहे का? . बँकेचे सभासद होण्यासाठी कुठल्या धर्मकायद्याचे बंधन नाही. तरी हा प्रकार मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा असून याप्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे दाद मागण्याशिवाय पर्याय नाही, असे खरमरीत पत्र फादर मायकल जी यांनी बंँकेला पाठवले आहे.
दरम्यान, ख्रिस्ती समाजात फादरांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. मात्र, फादरांनी आध्यात्मिक मार्गदर्शन करावे, आर्थिक व्यवहार असलेल्या संस्थांमध्ये त्यांचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी फादरांना सभासदत्व न देण्याचा अलिखित नियम आहे. फादरांना अशा कामासाठी बिशप हाऊसकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती बँकेतील एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मायकल जी वयोमर्यादेनुसार निवृत्त झाले असून सध्या सांडोर येथील विनालय आश्रमात कार्यरत आहेत. त्यामुळे मायकल जी यांचे सभासदत्व नाकारले गेल्याने ख्रिस्ती समाजात तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत.
बँकेचे सभासदत्व मिळावे यासाठी चार वर्षे अर्ज करीत आहे. पण, कधीच उत्तर दिले गेले नाही. चार वर्षांनी आलेले उत्तर पाहून बँकेचा निर्बुद्धपणा समोर आला.
- फादर मायकल जी
याआधीही धर्मगुरुंना सभासदत्व नाकारण्यात आले होते. त्यावेळी कुणीही आग्रह धरला नव्हता. धर्मगुरु होण्याआधी काहीं जण सभासद झालेले आहेत. याविषयी प्रशासनाकडून योग्य ती माहिती घेऊन बोर्ड मिटींगमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ.
- युरी घोन्साल्वीस,
उपाध्यक्ष, बॅसीन कॅथॉलिक बँक

Web Title: Catholic bank denied membership to religious leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक