शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक वेतन व निवड श्रेणीची अट रद्द करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:08 IST

तलासरी : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी वरिष्ठ आणि निवड श्रेणी वादाच्या भोव-यात सापडली आहे.

सुरेश काटे तलासरी : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी वरिष्ठ आणि निवड श्रेणी वादाच्या भोव-यात सापडली आहे. शालेय शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबरला शिक्षकांच्या या श्रेणीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांत तीव्र नाराजी आहे. या निर्णयातील चौथी अट रद्द करून न्याय द्यावा अशी विनंती शिक्षक सहकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी केली आहे. शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवड वेतनश्रेणी दिली जाते. ती सरसकट मिळत असे. पण नव्या निर्णयानुसार आता शिक्षकांना ती मिळविण्यासाठी त्यांची शाळा प्रगत असणे व शाळा सिद्धिमध्ये शाळेला अ दर्जा मिळालेला असणे तसेच माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत ९ वी व १० वी चा निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक असणे बंधनकारक केले आहे. या बाबी समाज, संस्था, पालक, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांशी संबंधित असतांना ्रशिक्षणाशी संबंधित शाळेतील शिक्षकांना जबाबदार धरून त्यांना हक्काच्या या लाभापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. शासन सेवेतील २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकारने जुनी पेंन्शन योजना नाकारली आहे. या निर्णयामुळे अनेक नवीन शिक्षकांचा वेतनश्रेणीचा हक्क हिरावला जाणार आहे. वास्तविक पाहता शाळा प्रगत करणे ही सांघिक कामगिरी असतांनाही त्याचा संबंध शिक्षकांच्या वेतन श्रेणीसाठी संबंध जोडणे चुकीचे आहे. म्हणून त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक