शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

पालघरमध्ये बविआ अन् कम्युनिस्टांची मोट, भाजपाच्या पराभवाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:01 IST

भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पराभव करणे ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्र आली आहे...

मनोर/पालघर - भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पराभव करणे ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्र आली असून ंलोकसभेसह सर्व निवडणुका आता एकत्रपणे लढविणार असल्याची घोषणा कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी गुरु वारी मनोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल रंग आणि बहुजन विकास आघाडी चा पिवळा रंग या दोन रंगाचे मनोमिलन (आघाडी) कार्यक्र माचे आयोजन मनोर मध्ये करण्यात आले होते. यावेळी माकपाचे कॉम्रेड अशोक ढवळे, बारक्या मांगात तर बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, आ.विलास तरे, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, जिप सभापती दामू पाटील, बविआचे जेष्ठ नेते प्रवीण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.२०१४ च्या निवडणुकी नंतरची पाच वर्षे भाजप व शिवसेनेमध्ये एकमेकांना शिव्या देण्यातच निघून गेली असून आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र आलेली आहेत. केंद्रात आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेची प्रचंड ससेहोलपट सुरू असून मागील पाच वर्षात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्के नि वाढले आहे. पालघर, नंदुरबार आदी भागात हजारोच्या संख्येने मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडली असून आजही हे मरणाचे सत्र सुरूच आहे. यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचे माकपचे ढवळे यांनी सांगितले. वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणी बाबत कुठलीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सरकारनी आपला वकील न्यायालयात उपस्थित न ठेवल्याने न्यायालयाने आदिवासी विरोधात दुर्भाग्यपूर्ण निर्णय दिल्याचेही त्यांनी सांगितले. मागील ४५ वर्षात वाढली नव्हती इतकी बेरोजगारी वाढली असून दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. उलट १ कोटी १० लाख लोकांना नोकरीवरून काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून लोकसभाच नव्हे तर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागा आम्ही एकत्र लढविणार असल्याचे शेवटी ढवळे यांनी सांगितले.खोटे बोला पण ठासून बोला हा भाजप चा पवित्रा राहिला असून आपला शत्रू कोण हे ओळखूनच काम करण्याचा निर्णय घेतल्याचे बविआ चे अध्यक्ष आमदार ठाकूर यांनी सांगून माकप सारखा एक चांगला मित्र आमच्या सोबत जोडला गेल्याचा मला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची जिल्ह्यात १ लाखाच्या आसपास मते असून जी कुठेही जात नाहीत त्यामुळे लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकजुटीने काम करू असे सांगितले. मी काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे आदी सर्वच पक्षांशी चर्चा केली असून येत्या काही दिवसात हे सर्व पक्ष आमच्याशी जोडले जातील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.उमेदवारांचा निर्णय आठवडाभरात ‘या’ तडजोडीवरच झाली आघाडीगरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पालघर लोकसभा निवडणूकीत कोणाचा उमेदवार निवडणूक लढवणार या बाबत निर्णय झाला नसला तरी काँग्रेसच्या वाट्याला असणाºया या क्षेत्रात काँग्रेसची ताकद नसल्याने बविआचा उमेदवारच निवडणूक लढविणार हे नक्की आहे. मात्र, त्याचा निर्णय येत्या ५-६ दिवसात आम्ही घेऊ असे आ. ठाकूर ह्यांनी सांगितले.माकप आणि बविआ यांच्या आघाडीमुळे पालघर लोकसभा व इतर निवडणुकीत बविआच्या उमेदवाराला सुमारे एक लाख मतदाराच्या मताधिक्याचे बळ मिळणार असून माकपकडून डहाणू आणि विक्रमगड विधानसभेत उमेदवार उभे करण्याची शक्यता पाहता बविआ आपली संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करण्याची तडजोड झाली आहे.‘मी भाजपातच राहणार’- गावित, ‘ते आमच्याकडे आल्यास स्वागत’- ठाकूरपालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आल्याने नाराज झालेले भाजपा चे खासदार राजेंद्र गावित हे बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश घेत निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त पसरविण्यात आले आहे.मात्र. हे वृत्त निराधार व खोडसाळ असल्याचे गावित यांनी पत्रकारांना सांगितले. पालघर लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते आमदार हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडी पक्षात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदीं व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याने मी भाजपा पक्षातच राहणार असल्याचे गावितांनी पत्रकारांना सांगितले.मला जायचेच असेल तर मी एखाद्या राष्ट्रीय पक्षात जाईल, बहुजन विकास आघाडी सारख्या एका संघटनेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पाशर््वभूमीवर मनोर येथे झालेल्या माकप आणि बविआ यांच्या आघाडीच्या मनोमिलन कार्यक्र माच्या पत्रकार परिषदेत खासदार गावित हे आपल्या पक्षात येणार असल्याच्या वृता बाबत आमदार ठाकूर यांना छेडले असता त्यांचे स्वागत असेल असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :palgharपालघरPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक