शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीच्या सराईत आरोपीला अटक; ५ गुन्ह्यांची उकल, गुन्हे शाखेच्या युनिटला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2024 17:31 IST

घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करत ५ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रविण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे परिसरात गेल्या काही महिन्यापासुन घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपीतांचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सततच्या घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने २९ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस विरारफाटा परिसरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत फिरत होते. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी दुचाकीवरून प्रवास करीत असल्याचे त्यांना दिसला. त्याची दुचाकी पोलिसांनी शिताफीने अडवल्यावर त्याला संशय आल्याने तो त्याच्या ताब्यातील पिशवी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला जागेवरच पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य त्यात कटावणी, हँडग्लोव्हज, स्क्रू ड्रॉइव्हर, पोपटपाना, बॅटरी तसेच चोराचा मोबाईल मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ५ ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्याने ओळखीच्या सोनाराकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. सोनाराकडून पोलिसांनी ४ लाख ७९ हजार ३४० रुपये किंमतीची ८ तोळे वजनाची चोरीच्या दागिन्यांची लगड हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल, साहित्यही हस्तगत केले आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल केली असून ३ गुन्ह्यात अटक करणे बाकी आहे. राहुल मुपनर असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा वालीव पोलिसांच्या कस्टडीत असून सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट दोन करत आहे.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, प्रशांतकुमार ठाकूर, अमोल कोरे, प्रतीक गोडगे, राजकुमार गायकवाड, अजित मैड, मसुब रामेश्वर केकान आणि सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस