शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बोर्डीमध्ये गणवेश घोटाळा, केंद्र शाळेतील प्रकार : शासनाकडून १.८४ कोटी व्यवस्थापनाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:57 IST

आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विकासाच्या मुख्य धारेत त्यांना आणता यावे यासाठी शासनाकडून त्यांना गणवेश अनुदान निधी दिला जातो.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विकासाच्या मुख्य धारेत त्यांना आणता यावे यासाठी शासनाकडून त्यांना गणवेश अनुदान निधी दिला जातो. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित असतांना बोर्डी येथील केंद्र शाळेमध्ये ती पालकांकडूनच वसूल केल्याचा प्रकार समोर येत आहे. हा प्रकार शासन निर्णया विरुद्ध असल्याने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशाचे चारशे रु पये थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या नुसार या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६ केंद्रातील ४६२ शाळांमधील पहिली ते नववीच्या ४५,९२५ विद्यार्थ्यांच्या गणवेश अनुदान प्रती विद्यार्थी ४०० रु पये या प्रमाणे १ कोटी ८४ लाख एवढा निधी शासनाकडून जमा झाला होता. पैकी १ कोटी ८३ लक्ष ७० हजार इतकी रक्कम या शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती तालुक्याच्या सर्व शिक्षा अभियान या विभागाकडून देण्यात आली. मात्र, पालघर या आदिवासी जिल्ह्यात पालकांचे अज्ञान आणि बँकेत शुन्य बॅलन्सची खाती उघडण्यात येत असलेल्या अडचणी या मुळे अनेक विद्यार्थ्यांची खातीच उघडलेली नाहीत. ज्या पालकांनी पदरमोड करून पाल्यासाठी दोन गणवेश शिवून घेतले त्याची रक्कम चारशे पेक्षा अधिक झाली. तथापी चारशे रु पयांचे बील द्यायला शिंपी तयार नसून पालकही ते घ्यायला राजी नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचा अंतिम टप्यात हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.पालकांवर आर्थिक व मानसिक दडपण-शासनाच्या या नव्या धोरणामुळे पालकांना गणवेश निधिचा आर्थिक भुर्दंड सोसावा तर लागलाच. शिवाय ही योजना पूर्णत्वास नेताना शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून ते मानिसक दडपणाखाली आहेत. परंतु ही कोंडी सोडवताना बोर्डी केंद्र शाळेत पालकांकडून प्रती विद्यार्थी चारशे रु पये रोख रक्कम घेतले आहेत. त्यानंतर एका स्थानिक ठेकेदारांकडून दोन गणवेश घेऊन त्याच्याकडून बील घेण्यात येणार आहे.या शाळेत ज्या पालकांचे दोन ते तीन पाल्य शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शाळेने केलेल्या या व्यवहाराला अज्ञान व अशिक्षतिपणामुळे प्रतिउत्तर देण्याची ताकद पालकांकडे नसल्याने शाळेचे फावले आहे. मात्र या बद्दल चौकशी समिती नेमून संबंधीत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या वार्डात झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा