शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बुलेट ट्रेनचा सर्व्हे रोखला, ‘जिका’ अर्थसहाय्य देणे थांबवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:39 IST

बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींचा सर्व्हे करण्यासाठी पडघा, वाकोरा येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज पुन्हा आलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना स्थानिक शेतकरी, भूमिसेना,आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखले.

- हितेन नाईकपालघर : बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींचा सर्व्हे करण्यासाठी पडघा, वाकोरा येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज पुन्हा आलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना स्थानिक शेतकरी, भूमिसेना,आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्यामुळे मुंबईतून सुसाट निघालेल्या बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाच्या वेगाला आदिवासी संघटनांनी मात्र ब्रेक लावल्याचे पहावयास मिळाले.जिल्ह्यातील बहुतांशी भागातील शेतकºयांनी बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हायवे प्रकल्पाला आपल्या जमिनी देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. २०२० पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. मात्र निव्वळ एका व्यक्तीच्या अट्टाहासापायी हजारो आदिवासी, शेतकºयांच्या कुटुंबांना एकाचवेळी उध्वस्त करणाºया या प्रकल्पांना आमचा विरोध असल्याचे सांगून जिल्ह्यातील भूमिसेना, आदिवासी एकता परिषद आदी अनेक संघटना, संस्थांनी विरोध दर्शविला आहे. तर गुजरात मधील शेतकºयांनी या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात याचिकाच दाखल केली आहे. दिवसेंदिवस या प्रकल्पांना होणारा वाढता विरोध पाहता बुलेट ट्रेनला अर्थसहाय्य करणाºया जिका या जपानी कंपनीने आपले अर्थसहाय्य ही रोखले आहे.त्यामुळे बुलेट ट्रेनला ब्रेक लागल्याचे संकेत मिळत असल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून जिल्ह्यातील अनेक अधिकाºयांवर दबाव येत असून सर्वसामान्य आणि शेतकºयावर खोटे गुन्हे दाखल करून दलालांच्यामार्फत विविध आमिषे दाखविली जात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. बेकायदेशीर सर्व्हे करण्यासाठी बुलेटट्रेनचे अधिकारी पोलिसांना घेऊन येत आहेत. वाद निर्माण झाल्यास अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यास आम्हालाही भाग पाडू नका, असा सज्जड दम एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी अधिकाºयांना दिला.बेकायदेशीर सर्वेक्षणाला उपस्थित भूमी सेना, आदिवासी एकता परिषद राजू पांढरा, दत्ता करबट, अशोक ठाकरे, मोरेश्वर दौडा, शशी सोनवणे आदी कार्यकर्ते तसेच पडघे गावातील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. परवानगी संदर्भातील कागदपत्रांची मागणी केल्यानंतर बुलेट ट्रेनच्या अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.>ते रिक्तहस्तच परतलेवन जमिनीचे सर्व्हेे करतांना वन विभागाचे अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते तसेच संबंधित वनपट्टाधारक आदिवासींची कुठल्याही प्रकारे संमती घेण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले. यावेळी स्थानिकांचा बुलेट ट्रेनला विरोध असल्याने सर्व्हे करता येणार नाही, असा संबधित अधिकारी आणि गावकºयाच्या सहीने पंचनामा देखील करवून घेतला आणि आल्या पावली र्स्व्हेवाल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन