शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन हटाव, रेल्वे बचाव; पडघे ग्रामस्थांचा सर्व्हेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 01:53 IST

बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी एनएचएसआरसीएलने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिका देत जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या, रेल्वे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने भूमिपुत्र बचाव आंदोलकानी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

पालघर : बुलेट ट्रेनचा सर्व्हे करण्यासाठी बुधवारी (२१ आॅगस्ट) अधिकारी येणार असे समजताच हा सर्व्हे हाणून पाडण्यासाठी पडघे गावातील सर्व ग्रामस्थ शेतावर, कामावर न जाता गावातच एकत्र जमले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्प होऊ देणार नाही, त्याचा सर्वे करू देणार नाही असा निर्धार व्यक्त करत बुलेट ट्रेनविरोधात सह्यांचे निवेदन तयार करुन ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पाठवून दिले. यावेळी आंदोलनाचे नेत काळूराम काका, शशी सोनवणे, नीता काटकर, मोरेश्वर दौडा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.१४ आॅगस्ट रोजी पडघे येथे ग्रामसभेचा अजेंडा ग्रामस्थांना न कळवता, ग्रामसभा आयोजित केली गेली. काही ग्रामस्थांना मोदींच्या नावे विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगून फसवून ग्रामसभेत आणले गेले. या ग्रामसभेत ग्रामस्थांना बोलू न देता काही दलाल मंडळींच्या दबावाखाली जबरदस्तीने फसवून बुलेट ट्रेनसाठी संमती देणारा ठराव घेण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर गावात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काही पक्षांचे दलाल यामागे कार्यरत असल्याचे भूमिपुत्र बचाव आंदोलक शशी सोनावणे यांनी सांगितले.बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी एनएचएसआरसीएलने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिका देत जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या, रेल्वे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने भूमिपुत्र बचाव आंदोलकानी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाºया गाव-पाड्यात या सुविधा पुरविण्याच्या नावाखाली वादग्रस्त ठरलेले आणि निवृत्त झालेले सरकारी अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, रोजगाराच्या शोधात असलेले तरुण, जमिनीच्या व्यवसायाची दलाली करणारे यांना या कामात उतरविण्यात आले आहे. साम, दाम, दंड, भेद याचा सर्रास वापर यासाठी केला जात असल्याचेही आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी पत्रकारांना सांगितले.काही मूठभर लोकांचे आर्थिक हितसंबंध जपण्याऐवजी डहाणू ते नायगाव रेल्वे मार्गात विशेषत: विरार-नायगाव पट्ट्यात लोकल ट्रेनने जीव मुठीत घेऊन मरण यातना सहन करणाºया प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, सुखकर रेल्वे सेवा उभारा, असेही धोदडे यांनी सांगितले. बुलेट ट्रेन विरोधात पालघर जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, भूमिपुत्र सातत्याने आंदोलन करत आहेत. अनुसूचित क्षेत्रात पेसा कायद्याअंतर्गत अनेकवेळा ग्रामसभा ठराव घेऊन जनतेने बुलेट ट्रेन विरोधी भूमिका शासनाला कळवली आहे. ११ व १३ जुलै रोजी ऐन शेतीच्या हंगामात शासनाने बुलेट ट्रेनच्या संमतीसाठी आयोजित ग्रामसभानींही पुन्हा एकदा आपला विरोध अधोरेखित केला आहे.

- या संदर्भात गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्याशी अनेकवेळा संपर्क, मेसेज पाठवूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.साम दाम दंड भेद वापरुन प्रशासनाकडून बुलेट ट्रेनसाठी केला जाणाºया प्रयत्नाचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.- शशी सोनावणे,भूमिपुत्र बचाव आंदोलन

 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन