शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द करू -नीलम गो-हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:16 IST

बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी प्रकल्पबधितांना दिली. शिवसेनेच्या जनसंपर्कदौऱ्याला तलासरीतील कवाडा गावातून सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

पालघर/तलासरी : बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी प्रकल्पबधितांना दिली. शिवसेनेच्या जनसंपर्कदौऱ्याला तलासरीतील कवाडा गावातून सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वेला विरोध दर्शविला होता. हा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी गावागावांत जाऊन ग्रामपंचायतींचे विरोधाचे ठराव घ्या, असे आदेश त्यांनी शिवसेना पदाधिका-यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवेविरोधात शिवसेनेच्या जनसंपर्कदौºयाला तलासरी (कवाडा) येथून सुरु वात झाली. पुढे डहाणू तालुक्यात आंबेसरी, वनई, पालघर तालुक्यात नंडोरे, विराथन आदी भागांत हे दौरे आयोजित करण्यात आले होते. या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या व्यथा गोºहे यांच्या समोर मांडल्या.बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस-वे या दोन्ही प्रकल्पांमध्ये आमच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने आम्ही उद्ध्वस्त होणार आहोत. याआधी दापचरी प्रकल्प (१९६०), सूर्या प्रकल्प (१९८२) अशा विविध विकास प्रकल्पांत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नसल्याचे वास्तव या वेळी मांडण्यात आले. प्रकल्प आणताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेणे, हा प्रकल्प रेटताना दैनंदिन रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर करणे, गावात प्यायला पाणी देणे, रस्त्यांची दुर्दशा, रोजगार आदी प्रमुख समस्यांकडे प्रशासनातर्फे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. तसेच कवाला, आंबेसरी, धामणगाव, वणई, साखरे, दाभळे या ग्रामपंचायतींमध्ये मंजूर करण्यात आलेले प्रकल्पविरोधी ठराव या वेळी सादर करण्यात आले.या वेळी शिवसेनेचे पालघर संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी तुम्हाला शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा असेल आणि तुमच्यान्याय हक्कासाठी शिवसेना कायम प्रयत्न करेल, असे सांगितले. या वेळी खा. विनायक राऊत, आ. अमित घोडा, पालघर लोकसभासंघटक श्रीनिवास वनगा, कवाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी शंकर छडा, विजय गोदळे, रमण खरपडे, सरपंच लता कातेला, उपसरपंच संजना पोकरे, तर आंबेसरी गावातील शेतकरी संदीप धामण, रामचंद्र सलाट, विजय नांगरे, सरपंच छोटू हालडे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हाप्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख राजेश शहा, माजी जिल्हाप्रमुख उदय पाटील, विधानसभा संघटक पालघर वैभव संखे, ज्योती मेहेर, शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.तुम्हीही लक्ष ठेवा...आ. नीलम गोºहे म्हणाल्या, १६ मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनविरोधात भूमिका घेतली आहे. ती भूमिका कायम राहील, तसेच तुमच्या जमिनींबाबत सरकारी अधिकाºयांकडून चुकीची कागदपत्रे रंगवली जात नाही ना याकडे तुम्हीही लक्ष ठेवा. कागदपत्रे वाचल्याशिवाय कुठेही स्वाक्षरी करू नका, मोजणी थांबवा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये या दोन्ही मुद्द्यांवर आवाज उठवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे