बुजडपाडा जि.प. शाळा पहिली आयएसओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 11:43 PM2020-03-01T23:43:02+5:302020-03-01T23:43:07+5:30

बुजडपाडा या शाळेने आयएसओ मानांकनाचे निकष पूर्ण करून पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नाव कोरले.

Bujdapada Zip The school's first ISO | बुजडपाडा जि.प. शाळा पहिली आयएसओ

बुजडपाडा जि.प. शाळा पहिली आयएसओ

Next

- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : २६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी डहाणू तालुक्यातील जि.प. कोटबी बुजडपाडा या शाळेने आयएसओ मानांकनाचे निकष पूर्ण करून पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नाव कोरले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शिक्षण विभागाचे पदाधिकारी आणि विविध संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने शाळेला हा गौरव प्राप्त झाला. ही कृतज्ञता शाळा प्रशासनाने आजही जपली आहे.
कोटबी या आदिवासी गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक बुजडपाडा शाळा असून तिची स्थापना ४ मार्च १९५७ साली झाली. प्रारंभी इयत्ता ४, त्यानंतर ७ वी आणि आठवी इयत्ता निर्माण करून टप्प्या-टप्प्याने शाळेचे विस्तारीकरण शिक्षकांच्या प्रयत्नाने झाले. मात्र गावात कायमस्वरूपी रोजगार संधीच्या अभावी पावसाळा संपताच स्थानिकांचे स्थलांतर सुरू व्हायचे आणि त्याच्यापाठोपाठ त्यांची मुलेही जाऊ लागल्याने या शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले. यावर तोडगा म्हणून शाळेने वसतीगृह सुरू केले. एवढ्यावरच न थांबता मुंबईस्थित सामाजिक संस्थांच्या मदतीने महिलांकरिता लघुद्योग सुरू केल्याने गळती थांबली.
दरम्यान, शाळा आयएसओ करावी अशी संकल्पना तत्कालीन केंद्रप्रमुख जयश्री राऊत यांनी मांडली. मुख्याध्यापक सुनील देशमुख आणि शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हा प्रवास सुरू झाला.
>शालेय उपक्र म
वसतिगृह, लघुउद्योग आदी उपक्रमांच्या माध्यमातून पालकांच्या हाताला काम देऊन पणत्या, आकाशकंदील, राख्या इ. निर्मिती, परसबाग, शाळेतील मदतनीस स्वयंपाकगृहात अ‍ॅपरण आणि ड्रेसकोड घालून काम, शाळेशी संबंधित सर्वांना ओळखपत्र, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची सुविधा.
>आयएसओ शाळा निकष पूर्ण करण्याचा निश्चय केल्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या बाबीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. राज्य आणि जिल्हास्तरावरून अधिकारी तसेच शिक्षणप्रेमी शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त करतात. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्वतयारीचे वर्ग घेण्याचा मानस आहे.
- सुनील देशमुख मुख्याध्यापक,
जि.प. शाळा कोटबी बुजडपाडा
>विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली
२०१४ साली एनजीओच्या माध्यमातून स्टेशनरी, दफ्तर, सायकली यांचा लाभ मिळू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली.

Web Title: Bujdapada Zip The school's first ISO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.