शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शाळांची घंटा वाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:54 IST

गुलाबाची फुले, चॉकलेट; नव्या वह्या, नवी पुस्तके, खाऊ याने पहिला दिवस झाला गोड

पारोळ : कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी १७ पहिली घंटा वाजली. गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली, तर पहिल्यांदा शाळेची पायरी चढणारी मूल आपल्या पालकांचा हात सोडायला नव्हती पालक त्यांची समजूत काढत होते.वसई जिल्हा परिषद शाळांची संख्याा ९० च्या घरात असून पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात तर काही शाळा नवीन प्रवेश घेण्याºया विद्यार्थी यांचे स्वागत फुले व खाऊ देऊन केले. काही शाळांनी पाठ्यपुस्तके मुलांना वितरण करण्याचेही आयोजन केले होते. काही शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून मुलांनी पहिल्या दिवशी स्वच्छतेचा संदेश दिला. तर नवे पुस्तक, नवा गणवेश, नवा वर्ग, नवी शाळा, नवे सवंगडी नवीन शिक्षक, असे सर्व काही नवे नवे सोबत घेऊन नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली.जि. प. शाळेत निघाली बैलगाडीतून मिरवणूकबोईसर : शासनाच्या आदेशान्वये समग्रशिक्षा अभियानाच्या माध्यमांतून प्रत्येक जि.प. शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्र म व पटनोंदणी पंधरवडा कार्यक्र माला आज जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. याच आदेशान्वये जि.प शाळा आंबेदे येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यांतून शाळेत पहिलीत प्रवेश घेणाºया नवागतांचे स्वागत बैलगाडीच्या मिरवणुकीतून झाले.कासामध्ये उडाली पालकांची तारांबळकासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात आज शाळेतील शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र वसतिगृहात मुलांना सोडण्यासाठी सकाळी पालकांची मोठी तारांबळ उडाली होती.सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत मुलांनी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. कासा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना फूल देवून मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विक्रमगडमध्ये प्रथमच शाळा तयारी कार्यक्रमविक्र मगड : तालुक्यातील ५० गावामध्ये प्रथम शिक्षण उपक्र म संस्थेकडून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करणाºया मुलांकरीता शाळा तयारी कार्यक्र म मेळावा सुरुवात करण्यात आले आहे. प्रत्येक गावामध्ये सुरुवातीला गावातील अंगणवाडी सेविका यांना शाळा तयारी मेळाव्याविषयी माहिती देण्यात आली. गावातील मुलांची चाचणी कशाप्रकारे घ्यावी व मुलांच्या शिक्षणात युवकांचा सहभाग याबाबत प्रबोधन झाले.प्रवेशोत्सवासाठी रांगोळ्या ढोल, ताशे अन् तरपा वादनबोर्डी : तालुक्यातील विविध शाळांमध्ये पिहली इयत्तेतील नवगतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभ आदींचे आयोजन उत्साही वातावरणात करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. शाळा प्रवेश दिनी दाखल पात्र विद्यार्थ्यांना हजर करून शाळां-शाळांमध्ये रांगोळी काढण्यात आली होती. त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून ढोल व घोषणांच्या जयघोषात मिरवणूक काढली.तलासरीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागततलासरी : शाळेचा पहिलाच दिवस , विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत तलासरीत करण्यात आले, कुठे मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले तर कुठे प्रथमच शाळेत पहिलीत येणाºया मुलांचे स्वागत झाले. शिक्षकांनी आपल्या दुचाक्या फुलांनी व फुग्यांनी सजवून त्यावरून मुलांना शाळेत आणल्याने त्यांच्यात शाळेची आवड निर्माण झाली होती.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण