शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरला ५५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 01:13 IST

बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.

- पंकज राऊत बोईसर : आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.इराणी वाडी ग्राऊंडवर आयोजिलेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि आमदार रविंद्र फाटक, पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, आधार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष-सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याचे शिवसेना समन्वय प्रभाकर राऊळ, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, पालघर जिल्ह्याच्या शिवसेना महिला संपर्क संघटक दीपा पाटील, पालघर जिल्ह्याचे शिवसेना युवा अधिकारी राकेश पाटील, शिवसेना पालघर विधानसभा संघटक वैभव संखे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेन्द्र सिंग, पालघर तालुका प्रमुख (पालघर व डहाणू विधानसभा) अशोक भोईर, जिल्हा परिषद सदस्य रंजना संखे, मिताली राऊत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे, साळुंखे व वीणा देशमुख, विदूर पाटील, वैदही वाढण आदी मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या गावातील वºहाडी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यात सहभागी झाले होते.आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार आदिवासी जोडप्यांचा विवाह पार पाडले असून अनेक वर्षांपासून त्यामार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखालील गरजूंचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जात असून प्रत्येक वर्षी वधू-वरांना संसारास लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येते. जगदीश धोडी यांनी या विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोरगरीब सहभागी होत असून प्रत्येक वर्षी संख्या वाढत आहे. असे सांगितले तर हा सोहळा सामाजिक उपक्रम असून कर्ज न काढता येथे लग्न कार्य होते तर लग्नानंतर होणाºया मुलांना शाळेत पाठवा. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका दारूने समाज बिघडवतो. म्हणून दारूपासून लांब राहा, असे खासदार गावित यांनी सांगितले.लग्न करण्यासाठी संपूर्ण गावाला भरपूर दारू पाजून मांसाहारी जेवण देणे आदिवासी समाजात अनिवार्य असते, त्यासाठी प्रचंड खर्च येतो तेवढा पैैसा जवळ नसल्याने अनेक आदिवासी कर्ज काढून त्या बदल्यात लगीन गडयाची वेठबीगारी पत्करतात म्हणजे कर्ज फिटेपर्यत त्या नवरा बायकोने कर्ज देणाºयाकडे वेठबिगार म्हणून राबायचे अशी घातक प्रथा या समाजात आहे. तिचे उच्चाटन या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रूपाने घडवून आणले जाते आहे.

टॅग्स :marriageलग्न