शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:50 IST

रक्तदानासाठी पोलीस पुढे सरसावले

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रक्तदान शिबिरासाठी रक्तदाते पुढे येत नसल्याने जिल्ह्यातील ब्लड बँकांतील रक्तसाठा केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. रक्ताची मागणी वाढत असताना जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालय या एकमेव शासकीय ब्लड बँकेत अवघ्या ३३ रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत. दरम्यान, रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे आपल्या पोलीस दलासह पुढे सरसावले आहेत.जिल्ह्यात निर्माण झालेल्या रक्तसाठ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सहा ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक शैलेश काळे यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आजवर एकूण ५१ हजार ९६५  बाधित रुग्ण झालेले आहेत. शनिवारी त्यात ५८५ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत १ हजार २३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे उपचारादरम्यान रक्ताची आवश्यकता भासत असून जिल्ह्यातील ७ ब्लड बँकेत २ ते ३ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्ताची निर्माण झालेली टंचाई भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे जास्तीत जास्त आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पालघर पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पालघर पोलीस दलामार्फत पालघर, बोईसर, डहाणू, कासा, तलासरी, जव्हार या क्षेत्रात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस मित्र, नागरिक यांनी आपला सहभाग नोंदवून रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपाधीक्षक काळे यांनी केले आहे. शासकीय ब्लडबँकेत ३३ बॅगापतंगशाहा कॉटेज हॉस्पिटल, ब्लड बँक जव्हार या शासकीय ब्लड बँकेत अवघ्या ३३ पिशव्या शिल्लक आहेत. मागच्या महिन्यात १७८ रक्त बॅगा रुग्णांना वाटप करण्यात आल्या असल्याचे ब्लड बँकेकडून सांगण्यात आले. या भागात महिलांच्या प्रसूतीच्या संख्या जास्त असून त्यांच्यासह अन्य भागातून रक्ताची मागणी झाल्यास पुरवठा केला जात असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन लसीकरणाआधी डिसेंबर, जानेवारीत झालेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने २०० ते २५० रक्त पिशव्या जमा व्हायच्या. लोकांनी आपला सहभाग नोंदवणे गरजेचे असून फक्त शासकीय रक्तपेढ्यांनी आयोजित रक्तदान शिबिरातच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे हा शासन आदेश बदलून सर्वच ब्लड बँकेच्या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करण्याची मुभा त्यांना द्यावी, अशी मागणी डी.के. छेडा ब्लड बँकेचे चेअरमन विजय महाजन यांनी केली. लसीकरणाआधी मी केले रक्तदानलसीकरणाआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले जात असून महाराष्ट्र ब्लड बँक, पालघरच्या चेअरमन लिनीट चव्हाण यांनी जिल्ह्यात रक्ताची मोठी टंचाई निर्माण झाल्याने लसीकरण करण्याआधी नागरिक, राजकीय पक्षप्रतिनिधी आणि तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सात ब्लड बँकाडी.के. छेडा ब्लड बँक, डहाणू  - ८ पिशव्या महाराष्ट्र ब्लड बँक, पालघर  - ० डी.के. छेडा ब्लड बँक, नालासोपारा - ०सरला ब्लड बँक आणि विजय ब्लड बँक, वसई - ५० बीएआरसी ब्लड बँक, बोईसर - ०पतंगशाहा कॉटेज हॉस्पिटल ब्लड बँक, जव्हार -  ३३ 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी