शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

काळ्या फिती लावून निषेध; वसई-विरार महापालिका कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:09 IST

दमदाटीविरोधात पोलिसात केली तक्रार

वसई : वसई विरार महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार होणारी दमदाटी, हल्ले, शिवीगाळ, अरेरावीची भाषा या विरोधात महापालिकेच्या कर्मचाºयांनी गुरूवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी त्रास देणाºया लोकांविरु द्ध कारवाई करण्याची मागणी विरार पोलिसाकडे केली. आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात येऊन या दादागिरी विरोधात घोषणाबाजी केली.वसई विरार महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकाºयांना गेल्या काही महिन्यांपासून कार्यालयीन कामकाजात व्यत्यय आणून नाहक त्रास दिला जात आहे. हे प्रकार सातत्याने वाढल्याने महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गुरूवारी काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सर्व प्रभागातील कर्मचारी व अधिकारी वर्ग या आंदोलनात सहभागी झाले होते.महापालिकेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच असा प्रकार झाल्याचे दिसून आले आहे. इतर वेळेस नागरीक महानगरपालिकेविरोधात विविध मागण्यासाठी आंदोलन करीत असतात परंतु महापालिका अधिकाºयांनी देखील गुरूवारी सकाळ पासून काळ्या फिती हाताला बांधून निषेध व्यक्त करत मुख्यालयासमोर आंदोलन केले. शनिवारी ‘एच’ प्रभागात कारवाईचे काम करताना प्रभागाचे सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंता यांना तीन ते चार तास जमावाने घेरून ठेवले होते. तसेच शिवीगाळ करून आयुक्तांना देखील संपवून टाकण्याची भाषा काही लोकांनी केली असल्याने अशा घटना वारंवार घडू लागल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.कर्मचाऱ्यांवरची आपबिती...२ फेब्रुवारी २०१८रोजी राजावली वाघाराल पाडा या ठिकाणी चाळीचे अतिक्र मणा विरोधात कारवाई साठी गेलेल्या पथकावर मोठ्या जमावाकडून जीवघेणा हल्ला झाला. दोन व चारचाकी वाहने व दोन जेसीबी पेटवून दिल्या होत्या.२५ एप्रिल २०१८ रोजी प्रभाग समिती ‘आय’च्या कार्यक्षेत्रात पालिकेच्या कर्मचाºयाला अमानुषपणे मारहाण केली होती.२३ मे २०१८ रोजी मध्ये प्रभाग ‘डी’च्या कार्यक्षेत्रात बेकायदा जाहिरात फलक याच्यावर कारवाईसाठी गेले असता धक्काबुकी करण्यात आली होती.८ डिसेंबर २०१८ रोजी प्रभाग समिती ‘एच’ मध्ये कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंता यांना शिवीगाळ करण्यात आली होती.अरेरावीची भाषा, शिवीगाळ, मारहाण हे प्रकार वाढू लागल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून काळ्या फिती बांधून अशा गुंड लोकांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.- रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्तमहानगरपालिकेच्या अधिकाºयांनी आमच्याकडे शिवीगाळ व अरेरावीची भाषा करणारे तसेच पालिकेच्या कर्मचाºयांना कारवाईसाठी गेल्यानंतर मारहाण करणार आहेत, त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या घटनेची सविस्तर चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल.-जयंत बजबळे,उपविभागीय पोलीस अधिकारीलोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव प्रशासनाच्या पाठीशी आहोत. महानगरपालिकेचे कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याबाबत असे प्रकार घडत असतील तर ते निंदनीय आहे.- सुदेश चौधरी,स्थायी समिती सभापती

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका