शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

सेनेने खाल्ली भाजपाची मते, कमळाची व्होट बँक फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:54 IST

आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे.

- नंदकुमार टेणीपालघर : आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात विजयाचे समिकरण पुन्हा कसे जुळवायचे हा प्रश्न सर्वच पक्षांना पडला आहे.डहाणू लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये पालघर झाला. त्यामध्ये काँग्रेस, राष्टÑवादी भाजपा, बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी असे ठरलेले ५ पक्ष होते. जेव्हा काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडी व्हायची तेव्हा एक पक्ष कमी व्हायचा तर शिवसेना आणि भाजप यांची युती असल्यामुळे आणि पालघर व डहाणू हे जागावाटपात भाजपाकडे असल्याने शिवसेनेने येथे आपला उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही त्यामुळे येथील लढत चौरंगी अथवा तिरंगीच होत असे. डाव्यांचा आणि बविआचा प्रभाव जिल्हयातील ३-३ तालुक्यात असल्याने ही लढत शक्यतो तिरंगीच व्हायची अशा स्थितीत शिवसेनेने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकीत आपला उमेदवार प्रथमच उभा करून या मतदारसंघातील मतांचे गणित आणि विजयाचे समिकरण बिघडवून टाकले आहे. त्यामुळे आता शिवसेना कुठल्या पक्षाची किती मते खाते याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. हे पाहता सेनेने सर्वाधिक मते भाजपची खाल्ली आहेत. त्यापाठोपाठ बविआ आणि डावे यांची मते वळविली आहेत. असे स्पष्ट होते. त्यामुळे आता या सर्वच पक्षांना आपल्या व्होटबँक अधिक मजबुत कराव्या लागणार आहेत. तसेच विजयाची समिकरणेही नव्याने जुळवावी लागणार आहेत.१४च्या भाजपाच्या मतात निम्मी मते होती शिवसेनेचीया पोटनिवडणुकीत प्रत्येक पक्षाला पडलेली मते पाहिली तर लक्षात येते की शिवसेनेने सर्वाधिक मते भाजपाची त्यानंतर काँग्रेस व त्यानंतर बविआची खाल्ली आहेत. वनगा यांना जी ५३३२०१ मते १४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळाली होती ती सर्वच भाजपाची नव्हती तर त्यात शिवसेनेची जवळपास निम्मी मते होती. म्हणूनच गावितांना यांना यावेळी २७२७८२ मते मिळाली. ५३३२०१ मधून ही २७२७८२ मते वजा केली तर उरतात २६०४१९ आणि वनगा यांना २४३२१० मते मिळाली आहेत. २०१४ मध्ये बविआच्या जाधव यांना २९३६८१ मते मिळाली आहेत ती यावेळी २३३८३८ झाली आहेत. म्हणजे त्यात ५९८४३ ची घट झाली आहे. तसेच १४ मध्ये येथे काँग्रेसचा उमेदवारच नव्हता तर डाव्यांच्या उमेदवाराने ७६८९० मते मिळविली होती. तर पोटनिवडणूकीत त्यांना ७१७८७ मते मिळाली आहेत याचा अर्थ ५१०९ एवढी त्यांची मते कमी झाली आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक