शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बविआच्या खांद्यावरून भाजपचा शिवसेनेवर नेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 05:18 IST

पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्यापासून भाजपमध्ये असलेली खदखद युतीच्या जागावाटपानंतर बाहेर पडली.

वसई, नालासोपारा, पालघर, डहाणूत थेट लढत : विक्रमगडमधील नाराजी कायम, डहाणूत भाजपसमोर मार्क्सवाद्यांचे कडवे आव्हानलघरच्या जागावाटपात शिवसेनेला झुकते माप दिले असले, तरी जेथे बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची लढत आहे, तेथे भाजपमधील उफाळलेल्या नाराजीमुळे बविआच्या खांद्यावरून शिवसेनेवर नेम धरण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांत आहे.यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना- बविआच्या नेत्यांचे ‘रात्रीचे खेळ’ कसे रंगतात, त्यातून चित्र कसे बदलते त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्यापासून भाजपमध्ये असलेली खदखद युतीच्या जागावाटपानंतर बाहेर पडली. त्याचे पडसाद नालासोपाऱ्यात उमटले. बोईसरमध्ये भाजपचे बंडखोर संतोष जनाठे रिंगणात आहेत. त्यांच्यामागे सारी संघटना आणि परिवार प्रचारात आहे. लोकसभेची उमेदवारी नाकारलेले श्रीनिवास वनगा पालघरमध्ये रिंगणात आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे योगेश नम यांच्यासोबत आहे. तेथे बंड केलेले माजी आमदार अमित घोडा यांची शिवसेना स्टाईल समजूत काढल्याने या लढतीतील चुरस कमी झाली आहे.मागील निवडणुकीत मोदी लाट असतानाही बविआने तीन जागा राखल्या होत्या. वसईत बविआचे हितेंद्र ठाकूर यांची लढत शिवसेनचे विजय पाटील यांच्याशी, तर नालासोपाºयात क्षितीज ठाकूर यांची लढत माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याशी होत आहे. त्यातील नालासोपाºयात भाजप-शिवसेनेतील बेबनाव सतत समोर येत आहे.विक्रमगडमध्ये माजी मंत्री विष्णू सवरा यांचा मुलगा डॉ. हेमंत यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्या पक्षातील नाराजी उफाळून आली. घराणेशाहीची चर्चा रंगली. ते बंड शमवण्यात आले, पण शिवसेनेतील नाराजी कायम आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील भुसारा करीत आहेत. डहाणूमध्ये भाजपचे पास्कल धनारे आणि माकपचे विनोद निकोले यांच्यातील लढत चुरशीची होईल, असे दिसते. दोन्ही उमेदवारांकडे भक्कम संघटनात्मक ताकद आहे. पण लोकसभेवेळी येथील मतदारांनी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांच्या पदरात अधिक मतांचे माप टाकले होते.रंगतदार लढतीबविआतून दोन वेळा बोईसरचे आमदार असलेले आणि आता शिवसेनेकडून लढणारे विलास तरे आणि बविआचे राजेश पाटील यांच्यात थेट लढत असली, तरी भाजपचे बंडखोर संतोष जनाठे यांच्यामुळे लढत चुरशीची बनली आहे.नालासोपाºयात बविआचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर विरुद्ध शिवसेनेचे प्रदीप शर्मा ही लढत गाजते आहे. येथे सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात आहेत.संघ परिवाराच्या पाठबळावरील भाजपचे पास्कल धनारे आणि तशीच संघटनात्मक बांधणी असलेले माकपचे विनोद निकोले यांच्यात डहाणूमध्ये काँटे की टक्कर होत आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे१वाढवण बंदर उभारणीच्या हालचालीसोबत डहाणूतील पर्यावरण प्राधिकरण हटविण्याबाबतच्या छुप्या हालचाली.२ मच्छीमारांच्या अनेक प्रलंबित मागण्या, तसेच हद्दीच्या वादामुळे उद््भवलेल्या समस्यांमुळे मासेमारी व्यवसायावर आलेले गंडांतर.३स्थानिकांचा रोजगार, त्या अनुषंगाने होणारे स्थलांतर आणि कुपोषण.४सूर्या धरणाचे पाणी सिंचनासाठी न देता ते वसई-विरार, भाईंदरला वळवण्यास विरोध.५ घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कमतरता..६ वाढते औद्योगिक प्रदूषण. त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम.७बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा कॉरिडॉर, फ्रेट कॉरिडॉर, अहमदाबाद महामार्गासाठीचे भूसंपादन. त्यातून होणारे विस्थापन.

टॅग्स :palghar-acपालघरnalasopara-acनालासोपारा