शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

कोट्यवधींची यंत्रसामग्री, वाहनखरेदी वादग्रस्त ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:53 PM

 वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा निघतो.

प्रतीक ठाकूरविरार : वसई-विरार महापालिकेने कोरोना संकटकाळात अन्य खर्चांना कात्री लावत वाहन खरेदी तसेच पालिका हद्दीत जमणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कोट्यवधीची यंत्रसामग्री घेतली, मात्र या सामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारी आवश्यक उपाययोजना पालिकेकडे नसल्याचे समजते. यातील काही यंत्रे पालिकेच्या भोयदापाडा येथील क्षेपणभूमीवर कार्यरत करण्यात येणार आहेत. मात्र, क्षेपणभूमीवर जाण्यासाठी लागणारा रस्ता आणि अन्य सुविधाही नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा फियास्को उडणार असून आगामी निवडणुकीत  हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा निघतो. हा कचरा महापालिकेच्या गोखिवरे- भोयदापाडा येथील क्षेपणभूमीवर जमा करण्यात येतो. हा कचरा आतापर्यंत पालिकेच्या विविध ठेकेदारांकडून जमा करून तो क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे. याकरिता महापालिकेने विभागवार २० ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. क्षेपणभूमीवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेकडे आतापर्यंत कोणतीही यंत्रणा नव्हती.

महापालिका क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला ८० लाख, पालिकेजवळ स्वतःची क्षेपणभूमी नसल्यामुळे ८० लाख, तर या दोन्हीची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीत न केल्यामुळे दर महिना २० लाख रुपये दंड ठोठावला होता. 

दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस पालिकेच्या विकासकामांसंदर्भातील बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही महापालिका कचरा व्यवस्थापनाबाबतीत कोणती पावले उचलली आहेत, याची विचारणा अधिकाऱ्यांना केली होती. यावेळी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. त्यानुसार १० ट्रॉमील, पाच पोकलेन, ५० ट्रिपर आणि दोन लाँग बूम, दोन शॉर्ट बूमची ऑर्डर दिली आहे. मात्र, या यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेकडे गॅरेज, मेकॅनिक व मेन्टेनन्ससाठी कोणतीही सुविधा नाही. तसेच भोयदापाडा क्षेपणभूमीवर जाणारा रस्ताही महापालिकेने बनवलेला नाही. परिणामी, खड्डे आणि कचरा भरल्या रस्त्यावरूनच ही वाहने पालिकेला न्यावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार