शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना घडला अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:34 IST

घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या चंदनसार परिसरात टँकरच्या चाकाखाली येऊन एका दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रताप नाईक (५५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते विरार येथील रहिवासी होते. घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने प्रताप नाईक हे  देवीची मूर्ती आणण्यासाठी जात होते. रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक अडकल्याने ते दुचाकीसह खाली पडले. यावेळी मागून येणाऱ्या टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातानंतर चंदनसार परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हा रस्ता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असल्याने या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आता जीवघेणा ठरत आहे. रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. काही संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करून घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. य प्रकरणी विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

अपघाताप्रकरणी टँकर चालक आनंदकुमार रामलाल यादव (२८) याला अटक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.

टॅग्स :VirarविरारAccidentअपघात