शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

लैैलाच्या भेटीसाठी आलेल्या मजनूला चोर समजून दिला बेदम चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 06:23 IST

मागील अनेक दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर असे ओरडायला सुरुवात केली.

नालासोपारा : विरारच्या फुलपाडा परिसरात प्रेमिकेला भेटण्यासाठी रविवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या मजनूला चोर समजून स्थानिकांनी फटकवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी प्रेमिकेला भेटण्यासाठी लपून छपून इमारतीच्या मागील बाजूने येणे या मजनूला चांगलेच महागात पडले आहे. या मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी आता त्या तरुणाला शोधून काढले असून याचा शोध घेत तपास करत आहे.

विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील डोंगरी विभागात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा एक तरुण मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रीलवर चढून मोठ्या कष्टाने टेरेसपर्यंत पोहोचला. दरम्यान बिल्डींग परिसरात वावरणाऱ्या रहिवाशांचे या त्याच्याकडे लक्ष गेले. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर असे ओरडायला सुरुवात केली. आपल्याला चोर समजत असल्याचे लक्षात आल्यावर हा तरुण घाबरला आणि पळ काढू लागला. एका बिल्डींगच्या टेरेसवरून दुसºया बिल्डिंगवर तो उड्या घेत असल्याने हा चोर असल्याचा संशय अधिक बळावला. अखेर २०० ते ३०० हून अधिक संतप्त नागरिकांनी त्याला खाली उतरवून चोप दिला. नागरिकांच्या मारहाणीत हा तरुण जखमी झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याचा शोध घेत असतांना सोमवारी दुपारच्या सुमारास विरार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तो आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे. तसेच हा तरुण याच परिसरात राहणारा असून रहिवासी त्याला ओळखत असल्याचेही पोलिसांना सांगितले असून नेमकी घटना काय होती, मारहाण करणारा किती जमाव मोठा त्यात कोण कोण होते मारहाण करण्यात आघाडीवर कोण होते हे आता पोलिसांना त्याने सांगितल्यावर गुन्हा दाखल केला जाईल.या मजनूची लैैला होती तरी कोण? या प्रश्नाची खमंग चर्चा महानगरात सध्या सुरू आहे. आता एवढे रामायण झाल्यावर तो दारू सोडतो की, प्रेयसीला सोडतो. याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी