शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

वसईतील बसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:41 AM

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील बसीन कॅथलिक बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि आणखी एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वसई/नालासोपारा : भाईंदर येथील एका ५३ वर्षीय मच्छीमार व्यावसायिकाच्या व्यवसायात भागीदारी करून गुंतवणूक करतो असे आश्वासन देऊन त्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील बसीन कॅथलिक बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि आणखी एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्याने वसई पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भार्इंदर येथील उत्तन लाईट हाऊस रोडवर राहणारे आणि मच्छी खरेदी - विक्र ीचा व्यवसाय करणारे मुनीर अब्दुल रेहमान शेख (५३) यांच्या व्यवसायात भागीदारी करण्याचे आश्वासन बॅसिन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य कार्यालयातील जनरल मॅनेजर अग्नेलो जोसेफ पेन आणि सचिन पांडुरंग पागधरे यांनी २०१६ ते २०१८ या काळात दिले.प्रत्यक्षात मात्र, आपापसात संगनमत करून या दोघांनी मुनीर यांची फसवणूक केली. चिश्तीया फिशरीजमध्ये भागीदारी घेऊन मुनीर यांच्या मच्छी व्यवसायाच्या विक्रीतून आलेली रक्कम तसेच मच्छीमार व्यावसायिकांकडून खरेदी केलेल्या मच्छीसाठी देणे असलेली रक्कम आणि आयसीआयसीआय बँकेत कर्ज घेण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी भरण्यासाठी दिलेली रक्कम यांसह मुनीर यांची जमीन विकून आलेली रक्कम अशा एकूण ४ कोटी १० लाख १९ हजार ९०९ रुपयांचा बनावट पत्राच्या आधारे या दोघांनी अपहार केला. तसेच या फसवणुकीबाबतची तक्रार केलीस, तर बघून घेईन अशी धमकी देखील मुनीर यांना देण्यात आली होती.दरम्यान, कॅथॉलिक बँकेच्या तज्ज्ञ संचालकांनी या कर्ज प्रकरणात व्यापक संदिग्धता असल्याचा अहवाल यापूर्वीच अध्यक्षासहित संचालक मंडळाला सादर केला होता. परिणामी, या सर्व प्रकरणात साठेमारी म्हणून बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता या महाकर्ज प्रकरणाचे तटस्थ विशेष लेखापरीक्षण करून घेतले जाईल अशी भूमिका घेतली होती.मात्र, या लेखापरीक्षणाचे सोपस्कार सुरू असतानाच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसत असल्याचे सांगत बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक तसेच इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला.तसेच पोलिसांचा अधित तपास सुरू आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी किंवा स्वत: अ‍ॅग्नेलो पेन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>तक्रारदार हे थकबाकीदारया प्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी अथवा लेखापरीक्षकांचा योग्य अहवाल न पाहता गुन्हे दाखल केले आहेत, ते चुकीचे आहेत. यातील तक्र ारदार हे बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे नक्कीच या चुकीच्या गुन्ह्यांमुळे सहकारातील अग्रगण्य नाव असलेल्या बँकेच्या नावाची बदनामी झाली आहे. बँक प्रशासन सर्व कायदेशीर बाबी तपासून या प्रकरणी बाजू मांडेल.-डॉमनिक डिमेलो, माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक,बिसन कॅथॉलिक बँक, पापडी मुख्यालय