शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:05 IST

परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील

पारोळ : परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील भातांचे नुकसान झाले. त्यामुळे या वर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकाऊन घेतल्याने वसईतील शेतकºयांना मदती ची गरज असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती वसई चे प्रकाश पाटील यांनी लोकमत ला सांगीतले.या पावसाने आडणे, भाताणे, कोपर खानिवडे, शिरवली, सायावन, पारोळ, उसगाव, मेढे वडघर, माजिवली, देपिवली इ. गावात मोठे नुकसान केले. शेतात पाणी साचल्याने भाताची करपे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत.सरकारने पालघर जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करावेत-निलेश सांबरेविक्रमगड : पालघर जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातशेतीचे पुरते वाटोळे केले असून या या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली असून आपण याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी प्रमाणात पीक घेण्यात येणारी हलवार शेतीची कापणी आटोपून, शेतकरी गरवा या प्रकारातील मुख्य भात शेतीचे हाताशी आलेले भरघोस पीक घरात आणण्याच्या वेळीच पावसाने या शेतीची उडविलेली धूळधाण पाहता पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जे काही थोडेफार पीक उरले आहे त्यावर विविध रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्याच बरोबर सध्या न झालेल्या भात पिकावर तुडतुड्या व खोडकीडा पडण्याची लक्षणे दिसत असल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. हा रोग झाल्यास भात पीक हाती लागतंच नाही असा शेतकºयांचा अनुभव आहे.विक्रमगड तालुक्यात या पावसामध्ये वीज पडून दोनजणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३५ ते ४० घरांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतातील भाताचे तयार पीक आडवे पडले आह.या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना पुन्हा ऐकदा मारले त्यामुळे येथील शेतकºयांपुढे दिवाळी कशी साजरी करावी? हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त केलेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाईचे वाटप तातडीने करावे. तसेच भातावर पडणाº्या रोगावर औषध उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश कृषी खात्याला द्यावेत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. तर दिवाळीसाठी खावटी दयावी अशीही मागणी आहे

टॅग्स :diwaliदिवाळीFarmerशेतकरी