शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन विकास आघाडीचा 'महाविकास' आघाडीला पाठिंबा, 'सिल्व्हर ओक'वर भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 21:11 IST

त्यानंतर लागलीच आमदार ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची "सिल्वर ओक"

आशिष राणे

वसई - आमदारहितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित  महाविकासआघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत विशेष म्हणजे बविआचे तिन्ही आमदार महाविकास आघाडी सोबत उस्फुर्त पणे सत्तेत सहभागी होतील,अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी लोकमत ला दिली. आज बुधवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी आपली हजेरी लावली आणि विधिपूर्वक शपथ ग्रहण केली,यावेळी वसई विधानसभेचे आम. हितेंद्र ठाकूर तसेच त्यांचे नालासोपाऱ्याचे आम.क्षितीज ठाकूर आणि बोईसर चे आम. राजेश पाटील या तिघांनी शपथ घेतली. त्यानंतर बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष आम. हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या तिन्ही आमदारांचा नव्या महाआघाडीच्या सरकारला पाठिंबा देत असल्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आम. अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केल्यावर आम.चव्हाण यांनी तसं ट्विटर वरून जाहीरही केलं.

त्यानंतर लागलीच आमदार ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची "सिल्वर ओक" या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि तिथे ही माझ्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला असल्याचे लेखी पत्र ही स्वाधीन करीत पवार यांच्याशी चर्चा केली,त्यावेळी पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल तसेच खासदार सुप्रिया सुळे या ही उपस्थित होत्या, दरम्यान बहुजन विकास आघाडी पक्ष या नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उस्फुर्त पणे सहभागी झाल्याची माहिती ही लागलीचआम. हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित माध्यमांना ही दिली. विशेष म्हणजे,या अगोदर महिना भर सुरू असलेला सत्तेच्या राजकीय खलबतावर  बारीक लक्ष देत नेमकं काय चाललंय यावर आम. हितेंद्र ठाकूर यांचे बारीक लक्ष होते, मात्र अपक्ष तथा छोटे पक्ष किंबहुना आम ठाकूर हे नेहमीच राज्यात ज्याची सत्ता त्याला पाठिंबा देत आले आहेत,त्यामुळे मधल्या काळात राज्यात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असताना बहुजन विकास आघाडीने महाआघाडी म्हणजे काँग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली होती. व भाजपची जरी सत्ता आली असती तरी त्यांनी भाजप सरकारलाच  पाठिंबा दर्शवला असता,मात्र आता नव्या महाविकास आघाडी ला बहुजन विकास आघाडी ने पाठिंबा दिला आहे त्यात तसं काही नवल नाही.

बिनशर्त पाठिंबा म्हणजेच तिन्ही मतदारसंघात विकासाला प्राधान्य द्यावे

....आमदार, हितेंद्र ठाकुरांची हीच मनीषा

आमदार ठाकूर यांनी मागील तीन दशकं जरी वसई व पालघर जिल्ह्यात सत्ता उपभोगली असली तरी मात्र राज्यात सरकार कुठलेही येऊ दे ।। माझा पाठिंबा म्हणजे त्याच्या बदल्यात मला माझ्या मतदारसंघात विकासासाठी प्राधान्य दयावे हीच मनीषा ठेवत आजवर आम. ठाकुर यांनी समाजकारण केलं आहे,आणि म्हणूनच इथं बविआ ची एकहाती सत्ता आजवर  आरूढ होऊन वसईचा विकास व कायापालट झाला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVasai Virarवसई विरारMLAआमदारHitendra Thakurहितेंद्र ठाकूर