शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उपचार न मिळाल्याने बाळाचा झाला मृत्यू, आरोग्य केंद्रात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:56 IST

कुडूस आरोग्य केंद्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : तालुक्यातील चंद्रपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्यावर योग्य ते उपचार न झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रविवारी पंचायत समितीच्या सभापती अश्विनी लहांगे, जि.प. सदस्य राजेश मुकणे  या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला धारेवर धरले.  

चंद्रपाडा येथील भक्ती पाटील (२३) या गर्भवतीच्या पोटात शुक्रवारी दुपारी दुखायला लागले. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार करून घरी पाठविले. मात्र,  रात्री तिला पुन्हा त्रास झाल्याने दवाखान्यात आणले. मात्र, बाळाचे ठोके कमी झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅ. तल्ला अन्सारी यांनी उपचारासाठी दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली. त्यावेळी बाळ दगावले होते.

आंदोलनाचा इशाराकुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत व योग्य उपचार न झाल्याने बाळ दगावल्याचा आरोप महिलेचा पती सागर पाटील यांनी केला आहे. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, रविवारी सकाळी लोकप्रतिनिधींनी कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. तल्ला अन्सारी यांची भेट घेऊन घटनेचा जाब विचारला. या पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय बुरपुल्ले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत डाॅ. अन्सारी यांच्या बदलीची मागणी केली. बदली न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHealthआरोग्य