शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

आयुष्यमान कार्डधारक रुग्णांची गुजरातमध्ये फरफट, तरुणाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 9:20 AM

कार्ड असूनही उपचाराअभावी तरुणाने गमावला जीव

सुरेश काटे

तलासरी : गुजरातमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णाचे हॉस्पिटलचे बिल राज्य सरकार देत नसल्याने गुजरातमधील रुग्णालये महाराष्ट्रातील रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याने आयुष्यमान कार्ड असूनही उपचाराअभावी आदिवासींचे मृत्यू होत असताना सरकार मात्र साखरझोपेत असल्याचा आरोप केला जात आहे. 

तलासरी तालुक्यातील झरी येथील आदिवासी तरुण प्रशांत लखमा ठाकरे (४५) याला शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराचा  झटका आला. त्याला वापी येथील हरिया रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारासाठी आयुष्यमान भारतचे कार्ड दाखविण्यात आले, पण हरिया रुग्णालयाच्या प्रशासनाने  कार्ड स्वीकारण्यास मनाई करून  उपचारासाठी रोख रक्कम भरण्यास सांगितले. प्रशांतच्या नातेवाईकांनी पैशांची तजवीज करतो असे सांगून उपचार सुरू करा असे सांगितले, परंतु त्याचे उपचार सुरू असतानाच रात्री त्याचा मृत्यू झाला. आयुष्यमान भारतचे कार्ड असताना जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास नकार दिल्याने व उपचारास उशीर केल्याने प्रशांतचा मृत्यू झाला. या वेळी प्रशांतच्या उपचाराचे १ लाख ८९ हजार ९८८ रुपयांचे बिल नातेवाईकांच्या हाती ठेवले. नातेवाइकांनी उधारी घेऊन  बिल भरून रविवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत रुग्णालयाकडे विचारणा केली असता राज्य सरकारकडून या योजनेचा उपचाराचा निधी मिळत नसल्याचे तेथील रुग्णालयांचे म्हणणे आहे.

पालघर जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारातलासरी भागातील तसेच पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालयात उपचाराची वानवा असल्याने या भागातील आदिवासी रुग्ण गुजरात आणि सिल्व्हासा येथील रुग्णालयात उपचारासाठी प्राधान्य देतात.  यातील बहुतांश रुग्ण हे पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील लाभार्थी असतात, मात्र गुजरातमधील रुग्णालये महाराष्ट्रातील रुग्णांना या आरोग्य योजनेचा लाभ देण्यास नकार देतात.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतGujaratगुजरातhospitalहॉस्पिटलNarendra Modiनरेंद्र मोदी