शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

आश्रमशाळा की विद्यार्थ्यांच्या छळछावण्या? - विवेक पंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:07 IST

आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे. मोखाडा तालुक्यातील हिरवे पिंपळपाडा येथील एका १५ वर्षांच्या विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केल्याच्या संशयास्पद घटनेनंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आश्रमशाळेतील प्रत्येक मृत्यू हा पोलीस कोठडीतील मृत्यू असे गृहीत धरून राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. घटनांबाबत खुनाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय कोवळ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांना कळणार नाही, असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पंडित यांनी केली आहे.जिल्ह्यातील मोखाडामधील हिरवे पिंपळपाडा आश्रमशाळेत नववीत शिकणाºया सुनील चंदर खांडवी या १५ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पण सुनीलचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. जांभूळमाथा येथे राहणाºया सुनीलचा मृतदेह मुलींच्या बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. ही घटना रविवारी घडली होती.यापूर्वीही अशा अनेक घटना घडून देखील याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही अथवा उपाययोजनेचे ठोस धोरणही राबवले गेले नाही. विवेक पंडित म्हणाले की, आश्रमशाळा विद्यार्थी हे अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्या ताब्यात म्हणजेच कायद्याच्या भाषेत कोठडीत असतात. त्यामुळे अशा घटना घडतात तेव्हा कोठडीतील मृत्यूबाबत मानवी हक्क आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्याचप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. मृत्यू झाल्यास २४ तासाच्या आत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला माहिती देण्यात यावी. तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष प्रत्यक्ष जागेवर प्रेताचा पंचनामा केला जावा. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रेताचे शवविच्छेदन करावे. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते मानवी हक्क आयोगाला पाठविण्यात यावे आणि हे मृत्यू केवळ अनैसर्गिक मृत्यू न समजता हे कोठडीतील मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू समजून मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांच्या लेखी काय आहे?मागील तीन वर्षांत शासकीय आश्रमशाळांमध्ये झालेल्या २८२ मृत्यूंची चिकित्सा केली. यात २८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारणच समजू शकले नाही असे त्यांनी नमूद केले आहे. २३ टक्के मुलांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर १२.६१ टक्के मुलांचा अचानक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.४.९२ टक्के विद्यार्थ्यांचा साप चावून मृत्यू झाला असून ४.२९ टक्के मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते. सर्वत्र ही अशी भयावह परिस्थिती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांच्या लेखी काय आहे? असा संतप्त सवाल पंडित यांनी केला. तातडीने याबाबत धोरण बनवावे, अशी मागणी या वेळी पंडित यांनी केलीवेगवेगळ्या कारणांनी १४१६ विद्यार्थ्यांचे मृत्यू : राज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा असून त्यात सुमारे एक लाख ९१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख ५३ हजार ८९१ विद्यार्थी आहेत. यामध्ये मुलींची संख्या निम्मी असून २००३ पासून २०१६ पर्यंत या आश्रमशाळांमधील १४१६ विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, आत्महत्येसह विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात ८ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार