शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

Ashadi Ekadashi: वारी चुकल्याची खंत, कायमच राहील; पांडुरंगच करील, संकटातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 01:03 IST

माऊलीला डोळे भरून बघण्याची इच्छा या वर्षी अपूर्ण राहणार आहे, ही खंत सतावत आहे. आमच्या या वारी सोहळ्यात महिलाही मोठ्या प्रमाणात प्रचंड उत्साहात सहभागी होत असतात

पालघर - ४२ मूळचे तारापूर येथील रहिवासी असलेल्या स्वर्गीय काशिनाथ कृष्णजी राऊत यांनी सुमारे ४२ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘श्री पंढरपूर वारी’चा वारसा पुढे त्यांचे पुत्र अ‍ॅड. शरद राऊत व कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवाराकडून आजही सुरू आहे. पालघर जिल्ह्यातून असंख्य वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असतात. मात्र त्यांच्या मंडळांची एकत्रित अशी नोंद झालेली आढळत नाही. प्रत्येक तालुक्यातून गटागटाने किंवा स्वतंत्रपणे लोक वारीला जातात, अशी माहिती अनेक वारकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.डोळे भरून दर्शन घेता येणार नाहीबोईसर : मागील अनेक वर्षांपासून मी नियमित पंढरपूरवारीमध्ये सहभागी होऊन श्री विठूमाऊलीचे दर्शन घेत आहे, परंतु या वर्षी आपली वारी मुकणार असल्याने प्रचंड दु:ख होत आहे. माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे भरून घेतलेले दर्शन एक वेगळा अनुभव असतो, पण या वर्षी कोरोनाच्या लागलेल्या ग्रहणामुळे आपल्या माऊलीचे दर्शन डोळे भरून घेता येणार नाही याची खंत वाटते.

श्री विठूमाऊली वारकरी मंडळ बोईसर तारापूरतर्फे आयोजित करण्यात येणाºया श्री पंढरपूर वारी व दर्शन सोहळ्यामध्ये सहभागी होणाºया भाविकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत असून सहभागी होणाºया प्रत्येकाला वारीचे वेध एक महिन्यापासून लागत असतात. - विठोबा मराठे, बोईसर, ता. पालघरमन अस्थिर, अस्वस्थही वाटते आहे!बोईसर : गेल्या ३५ वर्षांपासून मी श्री पंढरपूरवारीमध्ये अगदी न चुकता जात असून आषाढ महिना लागला की श्री विठ्ठल व रखुमाईच्या दर्शनाचे वेध लागतात. त्याचबरोबरच वारीत सहभागी होणाºया लाखो वारकऱ्यांची निस्सीम भक्ती व पांडुरंगावरील प्रेम पाहून तसेच वारकºयांमध्ये सहभागी झाल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती मिळते. मात्र या वर्षी कोरोनामुळे पांडुरंगाचे दर्शन व वारी सोहळ्याला मुकावे लागणार असल्याने मन अस्थिर होत असून अस्वस्थही वाटत आहे. माऊलीला डोळे भरून बघण्याची इच्छा या वर्षी अपूर्ण राहणार आहे, ही खंत सतावत आहे. आमच्या या वारी सोहळ्यात महिलाही मोठ्या प्रमाणात प्रचंड उत्साहात सहभागी होत असतात. - अशोक चुरी, मुरबे, ता. व जि. पालघरवारी चुकल्याची खंत, कायमच राहीलवाडा : गेल्या २५ वर्षांपासून नित्यनियमाने आम्ही पंढरीची वारी करीत आहोत. कितीही कामाचा व्याप असला तरी बाजूला सारून आम्ही सप्तमीलाच पंढरपुरात दाखल होतो. विठूमाऊलीचे दर्शन झाले की तहान-भूक हरखून जाते. एक आठवडा मुक्काम करून आम्ही घरी निघतो. घरी आल्यावर आम्हाला पुन्हा कामाची नवीन ऊर्जा पाप्त होते. वारीचा आनंद काही वेगळाच असतो. पंढरपुरात अनेक साधूसंतांचे दर्शन घडते. आषाढी एकादशीची वारी चुकल्याची खंत मात्र कायमच राहणार आहे. कोरोना महामारीमुळे उद्याची एकादशी पूर्ण दिवस मनोभावे पांडुरंगाची पूजा, भजने गाऊन घरीच साजरी करून कोरोना व्हायरसमुक्त देश कर, असे एकच साकडे विठूमाऊलीला घालणार आहे. - पांडुरंग पठारे, कळंभे, ता. वाडापांडुरंगच करील, संकटातून सुटकावाडा : वारकरी संप्रदायात आल्यापासून नियमितपणे ३८ वर्षे मी पंढरीची वारी करतो आहे. परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे वारीच रद्द झाल्याने यंदा महाराष्ट्रासह देशभरातले, जगभरातले सर्वच वारकरी हिरमुसले असून माऊलीचे दर्शन होणार नसल्यामुळे प्रचंड बेचैनही झाले आहेत. मागे पुढे उभा, राही सांभाळीत । आलीया आघात, निवराया ॥ कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरची वारी बंद करण्यात आलेली आहे. मात्र या संकटकाळात श्री पांडुरंगच देशासह संपूर्ण महाराष्ट्राची यातून सुटका करील, ही भावना. - लडकू शेलार, चांबळे, ता. वाडा

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी