शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

१५ दिवसांत आर्यनमॅन हार्दिकने पटकावले तीन विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 18:33 IST

स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ३.८ किलोमीटर स्विमिंग आणि ४२ किलोमीटर धावणे हे त्याने १४ तास ७ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- विरारचा आयर्नमॅन हार्दिक पाटील नेहमी नव नवे विक्रम करत आहे. त्याने परदेशात मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या तीन स्पर्धांमध्ये तीन विजेतेपद पटकावले आहे. तीन मोठे इव्हेंट पूर्ण करणारा हार्दिक पाटील हा एकमेव भारतीय ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत त्याने घवघवीत यश मिळवले आहे. तर बर्लिन आणि सिक्काको येथील फुल मॅरेथॉन स्पर्धा त्याने यशस्वी रित्या पूर्ण केली आहे.

स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ३.८ किलोमीटर स्विमिंग आणि ४२ किलोमीटर धावणे हे त्याने १४ तास ७ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. हार्दिकची ही २३ वी फुल आयर्नमॅन स्पर्धा असून त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. बर्लिन येथील १५ वी फुल मॅरेथॉन स्पर्धा त्याने ४ तास ७ मिनिटांत तर सिक्काकोमधील १६ वी फुल मॅरेथॉन स्पर्धा ५ तास ८ मिनिटात पूर्ण करून देशाचे नाव हार्दिकने लौकिक केला आहे.

या स्पर्धेसाठी जगभरातील १०० पेक्षा जास्त देशातील स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. हवामानच्या बदलानुसार बर्लिन आणि स्पेनमध्ये २८ ते ३० डिग्री टेंपरेचरमध्ये अतिशय खडतर ही स्पर्धा हार्दिकने पूर्ण केली आहे. हार्दिकच्या या कामगिरीचा पालघर जिल्ह्यासह विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला आहे.  एक व्यावसायिक असूनही तो वेळोवेळी जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि विजेता बनत आपल्या देशाचे नाव मोठ्या उंचीवर नेतो.

तसेच, हार्दिक हा एकमेव भारतीय आहे ज्याने जगभरातील सहा ठिकाणी जागतिक मॅरेथॉन प्रमुख मालिकेत स्पर्धा केली आणि एकूण पाच विक्रम केले. हार्दिकने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चार वेळा तसेच वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये चार वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा नोंद केली आहे. या वर्षात एक फुल आयर्नमॅन स्पर्धा आणि दोन हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा हार्दिकचा ध्यास आहे. त्यासाठी त्याने सराव देखील सुरू केला आहे. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचे देखील हार्दिकने लोकमतला सांगितले.