शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

विरारच्या आर्यनमॅन हार्दीक पाटीलने केले दोन आठवड्यात २ नवीन साहसी विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 16:36 IST

यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिकने ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे

मंगेश कराळे

नालासोपारा - विरारमध्ये राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांनी १७ वी 'कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२' यशस्वीरित्या नुकतीच पार केली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्येच नेदरलँड देशातील अँमस्टरडॅम येथे पार पडलेली 'टीसीएस पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा' देखील त्याने एक दोन वेळा नव्हे तर तब्बल नव्यांदा पूर्ण केली आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये १७ वी कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२ तसेच टीसीएस पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा यांमध्ये आयर्नमॅन हार्दिकने चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिकच्या या कामगिरीबद्दल विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे. त्याचे या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात ४ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. १७ तासांच्या कालावधीत ही आव्हाने सर करावी लागतात.

यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिकने ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदाच फुल आयर्नमॅनचा किताब पटकावून त्याने आपली घोडदौड सुरु केली होती. हार्दिकने चार वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच चार वेळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमांच्या नोंदी नोंदविल्या आहेत. आजवर त्याने शिकागो, न्यूयॉर्क, टोकियो, बोस्टन, लंडन, न्यूझीलँड, मेक्सिको, डेन्मार्क, तैवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.

स्पोर्टसमध्ये करीयर करणाऱ्यांसाठी फिटनेसचा कानमंत्र म्हणून आर्यनमॅन हार्दिकने सांगितले की, स्पोर्टस असो अथवा इतर कोणतही क्षेत्र असो, कितीही व्यस्त असाल तरी दिवसातला किमान एक तास तरी फिटनेससाठी द्या. कोणतही यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत, जिद्द आणि आपला फोकस किती महत्वाचा आहे हे देखील त्याने विशेष नमूद केले आहे. तसेच आपल्या 'आयर्न फिटनेस' क्लबच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातुन सक्षम असलेले आयर्नमॅन घडवण्यासाठी लागणार ट्रेनिंग आणि फायनान्सची व्यवस्था करणार असून, 'आयर्नमॅन फिटनेस क्लब' जॉइंट करण्याचे आवाहन आर्यनमॅन हार्दिकने तरुणांना केले आहे.