तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:38 PM2019-11-17T22:38:26+5:302019-11-17T22:38:34+5:30

पैशांसाठी निवडला मार्ग; पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

Arrested for blackmailing young women | तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

Next

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाºया एका तरुणीचे सोशल मीडियावर असलेले फोटो एडिट करून तो ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पीडित तरुणीने गुरुवारी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल करून त्याला अटक करत वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरातील २५ वर्षीय तरु णीच्या मोबाइलवर ११ आणि १२ नोव्हेंबरला आरोपी अनिकेत शेलार (२०) याने एक अश्लील फोटो एडिट करून तेथे पीडित तरुणीचा चेहरा लावला आणि तो फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. त्यानंतर १० हजार रु पयांची मागणी करून तिला ब्लॅकमेल करू लागला. तसेच पैसे दिले नाही तर दाभाड, नालासोपारा, कल्याण परिसरात व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. पीडितेने सर्व हकीकत घरच्यांना सांगून गुरुवारी तुळींज पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगत तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोबाइल नंबरद्वारे आरोपी तरु णाचा शोध घेऊन त्याला शुक्रवारी अटक केली.

नोकरीसाठी पैसे द्यावे लागतील, त्यामुळे अगोदरच तजवीज करून ठेवण्यासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा मार्ग आरोपी अनिकेत शेलार (२०) याने निवडला होता. त्यासाठी त्याने व्हॉट्सअ‍ॅपवरील सुंदर मुलींचे फोटो स्क्रीनशॉट घेत मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. त्यानंतर त्याने त्या फोटोचे अश्लील फोटोत एडीटिंग केले आणि त्या मुलींना त्यांचे असे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करु न बदनामीची धमकी देत होता. फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडून दहा ते वीस हजार रु पये रक्कमेची मागणी करत होता. पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलींना अशाप्रकारे तो ब्लॅकमेल करत होता. त्या मुलींनी पडघा पोलीस ठाण्यात याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. तर तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका मुलीला अशाप्रकारे तो ब्लॅकमेल करत असताना, पालघर पोलिसांच्या सायबर सेलच्या मदतीने आरोपी अनिकेतच्या मुसक्या आवळल्या आहे.

आरोपी अनिकेत शेलार हा मुंबईच्या कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत दुसºया वर्षात शिकत असून त्यांने एअर इंडिआमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. एअर इंडिआमध्ये नोकरीसाठी पैसे मोजावे लागतील असा त्याचा समज झाला होती. त्यासाठीच पैसे जमा करण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबला होता.
- डी एस पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे

Web Title: Arrested for blackmailing young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.