शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दापचरीनाक्यावर संशयितास अटक, भिलाडला १०० तर येथे गोळा होतात ४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:12 IST

तलासरी येथील तपासणी नाक्यावर वाहन पास करणाऱ्या टोळ्यांबरोबरच संशयीत लोकांचा वावर वाढला आहे.

- सुरेश काटे तलासरी -  येथील तपासणी नाक्यावर वाहन पास करणाऱ्या टोळ्यांबरोबरच संशयीत लोकांचा वावर वाढला आहे. बुधवारी रात्री तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तपासणी नाक्यावर रात्रीच्या अंधारात संशयास्पद फिरत असलेल्या मन्सुर हक खान याला अटक करण्यात आली. त्याची न्यायालयाने १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता केली.मुंबई अहमदाबाद महामार्गावर दापचरी येथे असलेला तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणाºया परप्रांतियांच्या टोळ्या कार्यरत असून अधिकाºयांच्या आशीर्वादाने ते अवजड वाहने पास करतात त्याचा वावर तपासणी नाक्यावर दिवसरात्र असतो तसेच येथील अधिकाºयांच्या दिमतीला त्याची खाजगी माणसेही असतात त्यांना अधिकारी कोड भाषेत पंटर म्हणतात.हे पंटर येथून जाणाºया वाहनचालकांकडून अधिकाºयांच्या सहमतीने पैसे घेतात त्याला वाहन चालक एन्ट्री म्हणतात. ही एन्ट्री दिल्याशिवाय वाहन तपासणी नाक्यावरून पुढे जाऊ शकत नाही ती न देणाºया वाहन चालकाला हे पंटर लोक दमदाटी करतात वेळप्रसंगी मारहाणही करतात पण राजकीय व शासकीय वरदहस्त लाभल्याने याबाबत आवाज उठत नाही.परराज्यातून आलेला वाहनचालक भानगड नको म्हणून तक्रारही करीत नाही त्यामुळे तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर येथे दिवस रात्र आहे पण याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा उद्योग पुन्हा सुरू झाला. यावेळी वाहने पास करणाºया टोळ्यातील निझामाउद्दीन मन्सूरहक खान हा अंधारात संशयास्पद फिरत असलेल्या तरु णास ताब्यात घेण्यात आले.मासिक ९६ कोटीं हडप?गुजरात मधील भिलाड येथील तपासणी नाक्यावर मासिक १०० कोटींचा महसूल जमा होतो तर दापचरी येथे मासिक फक्त ४ कोटींचा महसूल जमा होतो. यात मोठा भ्रष्टाचार होतो असा दावा नरेंद्र मोदी यांनीच गेल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार