महिला वाहकाची कॉलर पकडणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:47 PM2018-03-20T23:47:47+5:302018-03-20T23:47:47+5:30

पालघर- सातपाटी ही बस तात्काळ सोडण्याची मागणी नाकारणाºया पालघर एसटी डेपोतील वाहक मिताली नाईक ह्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाºया पंकज मनोहर पवार रा.सफाळे ह्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.

 The arrest of the female carrier's caller arrested | महिला वाहकाची कॉलर पकडणाऱ्यास अटक

महिला वाहकाची कॉलर पकडणाऱ्यास अटक

googlenewsNext

पालघर : पालघर- सातपाटी ही बस तात्काळ सोडण्याची मागणी नाकारणाºया पालघर एसटी डेपोतील वाहक मिताली नाईक ह्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाºया पंकज मनोहर पवार रा.सफाळे ह्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.
पालघर एसटी डेपोतून सोमवारी वाहक नाईक ह्यांनी ४:३० वाजता जेनेसीस, खारेकुरण, खामलोली व सातपाटी अश्या फेर्यासाठी चालका सोबत बस ताब्यात घेतली. शेवटची रात्री पावणे दहाची सातपाटीची शेवटची फेरी मारण्यासाठी चालकाने आपली बस पालघर रेल्वे स्थानका शेजारी उभी केल्या नंतर अनेक प्रवासी बस मध्ये शिरले. त्यातील आरोपी असलेल्या प्रवाशाने बसची बेल अनेक वेळा वाजवून तात्काळ बस सोडण्याची मागणी केली असता वाहकाने ही मुंबई वरून येणाºया लोकशक्ती ट्रेनला कनेक्ट असल्याने तात्काळ सोडता येणार नाही असे सांगितले. त्यावर आरोपी पवार ह्यांनी वाहक नाईक ह्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. त्यावर त्यांनी जवळच्या पोलीस चौकीत धाव घेतली, परंतु तेथे पोलीस नसल्याने त्यांनी पालघर पोलीस स्टेशन ला तक्रार कळविली.

Web Title:  The arrest of the female carrier's caller arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक