शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठ व्यक्तींच्या मृतदेहासाठी मोठ्या शवपेट्यांची सोय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:55 IST

लठ्ठ व्यक्तीचा मृतदेह आल्यास बर्फाच्या लाद्यांमध्ये ठेवला जातो.

मीरारोड -  स्थूल व्यक्तींचे प्रमाण वाढत असताना त्यांच्या मृत्यू पश्चात मृतदेह शवागारात ठेवायचा म्हटल्यास त्यांच्या आकाराची मोठी शव शीतपेटी नसल्याचे एका घटनेवरून समोर आले आहे . त्यामुळे महानगरपालिकेने  शवगृहात मोठ्या क्षमतेच्या शव शीतपेट्यांची तात्काळ सोय करावी, अशी मागणी मीरा भाईंदर महापालिकेचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्याकडे केली आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढतच आहे. पण एखाद्या लठ्ठ व्यक्तीचे निधन झाल्यास व त्याचा मृतदेह शवागार मध्ये ठेवायची वेळ आल्यास मोठ्या आकाराची शवपेटीच नसल्याने अडचण झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली . 

भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानक समोर राहणारे नितीन पांडुरंग पाटील ( ५८) यांचे मंगळवारी रात्री  रुग्णालयात  निधन झाले.  त्यांचे वजन सुमारे १६५ किलो इतके होते. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह महापालिकेच्या टेम्बा येथील शवागारात  ठेवण्यासाठी नेला होता. परंतु लठ्ठपणामुळे मृतदेह तेथील शवपेटीत जातच नव्हता. अखेर तेथील कर्मचाऱ्यांनी लठ्ठ व्यक्तीचा मृतदेह आल्यास बर्फाच्या लाद्यांमध्ये तो  ठेवत असल्याचे सांगितले . अखेर बर्फाच्या लाद्या आणून त्यात मृतदेह ठेवण्यात आला . आज बुधवारी सकाळी तो घरी आणून अंत्यविधी उरकण्यात आले . 

लठ्ठपणामुळे शवागारातील शीतपेटीत मृतदेह ठेवणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर रोहिदास पाटील यांनी सदर बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. महानगरपालिकेने तात्काळ मोठ्या क्षमतेच्या शव शीतपेट्यांची सोय करावी, अशी लेखी मागणी आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्याकडे  त्यांनी केली आहे . आयुक्तांनी मागणी मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल