शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा किल्ला ते वसई सागरी जलतरण मोहीम संपन्न, जिया रायचा नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:57 IST

Vasai News : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये ही पहिलीच जलतरण मोहीम आयोजित करण्यात आली होती.

वसई - वसई तालुका शिवसेनेने  कळम्ब स्पोर्ट्स फाउंडेशन  व शिवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व विजय पाटील फाउंडेशनच्या सौजन्याने अर्नाळा केला ते वसई किल्ला ह्या 22 किलोमीटर सागरी जलतरण मोहिमेला आज सकाळी 6.45 मिनिटांनी सुरुवात झाली. यावेळी तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, जिल्हा सह सचिव विवेक पाटील यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अर्नाळा किल्ल्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळी थंडगार हवेत सुरू झालेल्या या सागरी जलतरण मोहिमेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु नंतर मात्र भरती व ओहोटीमुळे जलतरणपटूंना थोडा त्रास झाला. विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी झालेल्या गतिमंद जिया राय या 14 वर्षाच्या मुलीने आपलाच 14 किलोमीटरचा पूर्वीचा विक्रम मोडीत काढून तिने आज जवळपास 25 किलोमीटरचे भले मोठे समुद्र अंतर पार केले. मंगळवारी संपन्न झालेल्या या जलतरण मोहिमेत राष्ट्रपतीपदक विजेता प्रभात कोळी याने 6 तास 3 सेकंद, कार्तिक गुगल 6 तास 11 मिनिटे, राकेश कदम 6 तास 43 मिनिटे,शार्दूल घरत 6 तास 48 मिनिटे आणि जिया राय हिने 7 तास वेळ घेतली.

पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये ही पहिलीच जलतरण मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहीमचा समारोप दुपारी 2 वाजताच्या सुमारास वसई किल्ल्यात झाला. दरम्यान या कार्यक्रमाच्या समारोपाला माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण,पालघर जिल्हा सहसचिव विवेक पाटील, महाराष्ट्र जलतरण असो.चे सचिव किशोर शेट्टी उपाध्यक्ष डॉ.जयप्रकाश दुबले ,वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित शिवसेना शहर प्रमुख राजाराम बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय गुरव व  प्रथमेश राऊत यांनी केले तर आभार विभाग प्रमुख शशीभूषण शर्मा यांनी मानले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwimmingपोहणे