एरिया श्वानांचा असतो : संपूर्ण जंगल हे वाघाचे असते; मुख्यमंत्र्यांची डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:34 AM2018-05-21T06:34:42+5:302018-05-21T06:34:42+5:30

इथले काही महाभाग म्हणतात की, मुख्यमंत्री कुणीही असो तो माझ्या खिशात असतो.

Area is of the dogs: the whole forest is tigers; Chief Minister Sultan | एरिया श्वानांचा असतो : संपूर्ण जंगल हे वाघाचे असते; मुख्यमंत्र्यांची डरकाळी

एरिया श्वानांचा असतो : संपूर्ण जंगल हे वाघाचे असते; मुख्यमंत्र्यांची डरकाळी

googlenewsNext


नालासोपारा : कोणत्याही परिस्थितीत वसई, विरारमधील हरितपट्टा कायम ठेवला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील प्रचारसभेत केली. काहीशा खवचटपणे ते म्हणाले, मी इकडे येत असतांना एकाने विचारले कुठे चालले आहात, मी सांगितले वसई विरारला सभा घ्यायला चाललो आहे. तेव्हा त्याने सांगितले वो एरिया तो किसी एक का है! तेव्हा त्याला मी सुनावले एरिया श्वान का होता है । और पुरा जंगल शेर का होता है। ये मेरा है ऐसा उसे बताना नही पडता.
इथले काही महाभाग म्हणतात की, मुख्यमंत्री कुणीही असो तो माझ्या खिशात असतो. परंतु मी सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या साडेदहा कोटी जनतेचा मुख्यमंत्री ज्यात मावेल असा खिसा आजपर्यंत ना कधी तयार झाला ना यापुढे तयार होईल. मोगल, ब्रिटीश असे कितीक आलेत आणि गेलेत त्यांच्यापुढे अशा खिसेकऱ्यांची काय मातब्बरी समजावी. असा सवाल त्यांनी केला.
या देशातल्या ज्या २० कोटी जनतेने आयुष्यात कधी बँक पाहिली नव्हती त्यांना बँकेची खाती मोदी सरकारने उघडून दिली. देशाच्या आर्थिक प्रवाहात आणले. ६० लाख शौचालये बांधलीत आणि हे राज्य हगणदारीमुक्त केले. यापूर्वी कोणताही सुशिक्षित तरूण अथवा तंत्रज्ञ बँकेमध्ये कर्ज मागायला गेला तर बँक म्हणायची हम आपके है कौन कारण त्याच्याकडे तारण नसायचे, भांडवल नसायचे. परंतु प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे कोट्यवधी युवकांना स्वत:च्या पायावर उभे केले गेले.उपस्थित असलेल्या जनसमुदायाकडे पाहून ते म्हणाले २८ तारखेला विजय कुणाचा होणार आहे हे या जनसमुदायाने आजच सांगून टाकले आहे. ही निवडणूक गल्लीतली नाही दिल्लीतली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच राजेंद्र गावीतांना विजयी करा. १७०० कोटी रुपये खर्चून सूर्याचे पाणी या परिसराला देणारी योजना आपले सरकार राबवणार आहे. त्यामुळे भाजपाच्याच उमेदवाराला विजय करा, असे आवाहन त्यांनी केले.
येथे काहीजण धमक्या देतात आमचीच शिट्टी वाजवा नाहीतर तुमची शिट्टी वाजवू. कुणी खंडणी वसूल करतात. परंतु अशा सगळ्यांना वठणीवर आणल्याशिवाय आपले सरकार राहणार नाही.अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Area is of the dogs: the whole forest is tigers; Chief Minister Sultan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.