शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सधन कुटुंबेही रोहयो यादीत?

By admin | Updated: November 27, 2015 01:52 IST

विक्रमगड तालुक्यात रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणले असून अशा बोगस कामांची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई व्हावी

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणले असून अशा बोगस कामांची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी सात आठवडे १०१ मजूर कामावर असल्याचे दाखवले. प्रत्यक्ष ३७ मजूर बोगस नोंदवले गेले आहेत आणि त्यांची नावे रोहयोच्या संकेतस्थळावरही आहेत. याउलट, काम केलेल्या ३८ मजुरांना मजुरीपासून वंचित ठेवले गेले. श्रमजीवी संघटनेच्या विक्रमगड तालुक्याचे सचिव कैलास तुंबडा यांनी सोमवारी गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतरदेखील बोगस नावे नोंदविली गेली. बोगस मजुरांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि ते उचललेदेखील गेले. श्रमजीवीचे विवेक पंडित आणि सहसचिव विजय जाधव यांनी कागदपत्रांसह पुराव्यानिशी सर्व माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केली. त्या सर्वांवर पांघरूण घालण्यासाठी गटविकास अधिकारी विश्वनाथ पिंपळे यांनी न केलेला पत्रव्यवहार रातोरात कागदपत्रांना जोडला. परंतु, त्याची जावक रजिस्टरमध्ये नोंद राहून गेल्याचे उघडकीस आल्याचा त्यांचा आरोप आहे. या आधारेच या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)१आलोंडे येथील दळवीपाडा रस्त्याचे काम दोन आठवड्यांपासून सुरू केल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात कोणत्याही कामाचा मागमूस तेथे दिसत नाही. पारदर्शकता आणि कार्यक्षम योजनेचे प्रतिक म्हणून ज्याचा गाजावाजा होतो, त्या संकेतस्थळावर सधनांची नावे मजूर म्हणून दिसतात. २देवनाथ मोहन भोईर एस्टीम कंपनीत कायमस्वरूपी कामावर आहेत. त्यांचेही नाव मजुरांच्या यादीत आहे. सुरेखा सुरेश बुंदे यांची स्वत:ची झडपोली येथे खानावळ आहे. त्यांनीही रोजगार हमीवर काम केल्याची नोंद आहे. ३संजय अगिवले हे विक्रमगडमधील स्वत: मजूर ठेकेदार आहेत. प्रशासनाने मात्र त्यांच्या कुटुंबाला मजूर दाखविले आहे. त्यांची अंथरुणाला खिळलेली आई सुनंदा कृष्णा अगिवले आणि वडील कृष्णा बंडू अगिवले रोहयोवर काम करतात अशा नोंदी आहेत. सदाशिव विष्णू अगिवले हे अपंग आहेत आणि ते कामाची प्रतीक्षा करत असून काम कधी सुरू होईल, याच्या चिंंतेत आहेत. पण, कागदोपत्री ते गेले दोन आठवडे कामावर असून भिवंडी येथे काम करणारा त्यांचा मुलगा मिलिंद अगिवले आणि मुलगी शुभांगी सदाशिव अगिवले येथील कामांवर दिसत आहेत.