शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

उत्कृष्ट कामगिरी करत गुन्ह्यांची उकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2023 19:56 IST

पोलीस आयुक्तालयात दरमहा आयुक्तालयातील हद्दी मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा मासिक आढावा बैठकीत घेतला जातो .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडेय यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करत गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार दरमहा घेतल्या जाणाऱ्या मासिक गुन्हे आढावा बैठकी वेळी करण्यात आला . 

पोलीस आयुक्तालयात दरमहा आयुक्तालयातील हद्दी मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा मासिक आढावा बैठकीत घेतला जातो . त्या बैठकीत मागील महिन्यात महत्वाच्या अश्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार केला जातो . जानेवारी महिन्यात  बनावट विमा पॉलिसी चे आंतराज्य रॅकेट उघडकीस आणणाऱ्या सायबर शाखेचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर व त्यांच्या पथकास गुन्ह्याची उत्कृष्ट उकल क्रमांक १ ने प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले . गुंजकर व पथकाने विमा कंपनीतील कर्मचाऱ्यासह ४ आरोपीना अटक करून मोठ्या प्रमाणात मोबाईल आदी जप्त केले . ह्यात अनेकांची बनावट पॉलिसी देऊन फसवणूक केली गेली आहे . 

क्षुल्लक वादातून मीरारोड मध्ये अंकुश राज ह्याची हत्या करणाऱ्या ९ आरोपीना काही तासात अटक करून मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे अविराज कुराडे तसेच मीरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल आणि पोलीस पथकास विशेष रिवॉर्ड १ ने सन्मानित करण्यात आले . 

उत्कृष्ट गुन्ह्याची उकल क्रमांक २ चे पारितोषिक गुन्हे शाखा २ वसई युनिटचे निरीक्षक शाहूराज रणवरे व पथकास देण्यात आले . नायगाव खाडीत वाहून जाणारा मृतदेह कमरुद्दीन अन्सारी ह्या गोरेगावच्या व्यक्तीचा असल्याची ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्यात शेजारी राहणाऱ्या पती - पत्नी आरोपीना पोलिसांनी वापी येथून अटक केली . 

मध्यप्रदेश वरून गाडीने येऊन पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एटीएम केंद्रात गोंधळ घालून एकाची फसवणूक करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला पेल्हार पोलिसांनी अटक केल्या प्रकरणी उत्कृष्ट गुन्ह्याची उकल क्रमांक ३ चे पारितोषिक वरिष्ठ निरीक्षक वसंत  लब्दे  याना देण्यात आले . 

विरार भागात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अक्रम अन्सारी ह्याला अटक करून १४ घरफोड्या उघडकीस आणणारे विरार गुन्हे शाखा ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व पथकास विशेष रिवॉर्ड २ ने तर गटारावरील झाकणे , रिक्षा , गॅस सिलेंडर, दुचाकी व रोख अश्या विविध चोऱ्या करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला जेरबंद करणारे वळील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांना विशेष रिवॉर्ड ३ ने पोलीस आयुक्तांनी सन्मानित केले आहे .