शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती; पण पोलीस ठाण्याची हद्दच निश्चित अजूनही प्रलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 20:57 IST

मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील काशीमीरा पोलीस ठाणे हे मीरा भाईंदर मधील वजनदार पोलीस ठाणे मानले जाते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र वनकोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मात्र ह्या प्रस्तावित ठाण्याची हद्द व पोलीस ठाण्याच्या जागेची अजून निश्चिती झालेली नाही . 

मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील काशीमीरा पोलीस ठाणे हे मीरा भाईंदर मधील वजनदार पोलीस ठाणे मानले जाते . ह्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त ऑर्केस्ट्रा बार , लॉजिंग आहेत . या शिवाय औद्योगिक वसाहती , नवीन इमारत बांधकाम , झोपडपट्ट्या , निवासी संकुल , महामार्ग व घोडबंदर मार्ग , मोकळ्या जमिनी येतात . त्यामुळे या पोलीस ठाण्यासाठी मोठी चुरस असते . 

वाढत्या शहरीकरणा मुळे ठाणे ग्रामीण पोलीस असताना काशीमीरा पोलीस ठाण्याची विभागणी करून काशीगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता . त्यासाठीची हद्द निश्चिती केली गेली होती . नंतर मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्या नंतर प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बदल करण्यात आला . परंतु पोलीस ठाण्यांची हद्द अजून निश्चित होऊन मंजुरी मिळालेली नाही . 

प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी जितेंद्र वनकोटी यांची नियुक्ती केली गेली आहे. ६ ऑक्टोबर रोजी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी वनकोटी यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. आदेशात देखील प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे असे स्पष्ट नमूद आहे . 

काशीगाव पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची व्यवस्था , मनुष्यबळाचे व्यवस्थापन आदी कार्यवाही करून काशीगाव पोलीस ठाणे स्थापन करणे व कार्यान्वित करण्याची कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे ह्या नियुक्ती आदेशात नमूद केले आहे . 

पोलीस आयुक्तालय झाल्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी जितेंद्र वनकोटी यांच्या कडे गुन्हे शाखेची जबाबदारी दिली होती . त्या नंतर दाते यांनी नया नगर सारखे ताणतणावाचे मानले जाणाऱ्या पोलीस ठाण्याची धुरा सोपवली होती . त्यामुळे काशीगाव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी वनकोटी यांच्यावर दिल्याचे मानले जाते . 

 

परंतु पोलीस ठाण्याची हद्दच जिकडे निश्चित नाही. पोलीस ठाण्याच्या जागे पासून अनेक मूलभूत कामांची पूर्तता अजून बाकी असल्याने एकूणच पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी काही कालावधी लागणार हे निश्चित . वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नेमल्याने आता वनकोटी यांना बसण्याची जागा आधी शोधावी लागणार आहे . 

 

शिवाय पोलीस ठाणे कार्यान्वित करायचे तर सुरवातीला काही कर्मचारी , संगणक , कार्यालय आदी व्यवस्था सुद्धा आवश्यक ठरणार आहे . दरम्यान पोलीस विभागातील जबाबदार अधिकारी यांनी सुद्धा काशीगाव पोलीस ठाण्याची हद्द अजून निश्चित झाली नसल्या बाबत दुजोरा दिला आहे . 

टॅग्स :Policeपोलिस