शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या नेमणुका करा शाळांच्या पटसंख्येप्रमाणे! अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:12 IST

या तालुक्यात २३५ शाळापैकी २० शाळा या २० पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे त्यातील एक शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त करा अशी, मागणी माकपाचे राजा गहला यांनी केली आहे.

विक्रमगड : या तालुक्यात २३५ शाळापैकी २० शाळा या २० पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे त्यातील एक शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त करा अशी, मागणी माकपाचे राजा गहला यांनी केली आहे.पूर्वी आम्हांला शिकता आले नाही पंरतु आमच्या मुलांना चांगले शिकता यावे यासाठी पटसंख्येनुसार आवश्यक शिक्षकांची नेमणुक करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली . तालुक्यात ज्याची पटसंख्या शंभराच्या जवळपास अशा शाळांत एकच शिक्षक आहे व २० पेक्षाही कमी पटसंख्या त्या शाळेत दोन शिक्षक आहेत हा विरोधाभास दूर करून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील एक शिक्षक जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेला देण्यात यावा अशी मागणी माकपने केली आहे.तालुक्यात गोडपाडा येथे ११७ पटसंख्या पण शिक्षक एक, तर म्हसेपाडा येथे पटसंख्या ९ शिक्षक दोन असा विरोधाभास असणाºया अनेक शाळा आहेत.याबाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर शिक्षण विभागाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहेयाबाबत शिक्षणाधिकारी मोकाशी यांना विचारले असता तालुक्यात २६ शाळाचा अतिरिक्त शिक्षक नेमणुकीचा प्रस्ताव पाठविला आहे हे अधिकार जिल्हा परिषदेला असून फेरबदल ते करतील.तालुका स्तरावर अधिकारी नाहीत त्यामुळे शिक्षकांची बदली करता येत नाही शाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असतांनाही या हालचाली झाल्या नाही म्हणजे शिक्षण विभाग किती कार्यक्षम आहे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.१५६ जागा रिकाम्यातसेच तालुक्यातील १९ शिक्षकाच्या बाहेर बदल्या झालेल्या आहेत व त्याबदल्यात फक्त पाच शिक्षक देण्यात आले आहेत. त्यातील दोनच हजर झाले तालुक्यात ७२ शिक्षक, ७७ पदवीधर शिक्षक, व ७ मुख्याधापक यांच्या जागा रिक्त आहे या जागाही भराव्यात अशीही मागणी माकपने सरकारकडे केली आहे

टॅग्स :Teacherशिक्षक