शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरारमधील हार्दिकच्या शिरपेचात आणखीन एक तुरा, युरोपमध्ये १४ दिवसांत दोन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 13:39 IST

Hardik Patil: विरारचा आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने युरोप खंडात एस्टोनिया व स्वीडन देशात १४ दिवसात एकापाठोपाठ एक अशा दोन पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक नवीन विक्रम केला आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा - विरारचा आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने युरोप खंडात एस्टोनिया व स्वीडन देशात १४ दिवसात एकापाठोपाठ एक अशा दोन पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक नवीन विक्रम केला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हार्दिकने २२ वेळा पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. “ हाल्फ आयर्नमॅन” स्पर्धा शर्यत १९ वेळा यशस्वीरित्या पूर्ण करणारा विक्रमदेखील हार्दिकच्याच नावावर आहे. ५ ऑगस्टला युरोप खंडात हार्दिकने एस्टोनिया येथे २१ वी व लगेच १९ ऑगस्टला स्वीडन येथे २२ वी पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पुर्ण केली आहे. हार्दिकच्या या यशाबद्दल वस‌ईकरांची मान अभिमानाने उंचावली असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. ते १७ तासांत पूर्ण करण्याची निर्धारित वेळ होती पण त्याने १३ तास १० मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. जगभरात सहा ठिकाणी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणारा तो एकमेव हिंदुस्थानी ठरला आहे.

देश विदेशातील स्पर्धेत सहभागयापूर्वी हार्दिकने आशिया खंड, यूरोप व अमेरिका या तिन्ही खंडातील डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, तैवान, न्युझीलँड, अमेरिका, एस्टोनिया, मस्कत, अरीझोना, फ्लोरिडा, दुबई, गोवा, इंडोनेशिया या देशांमध्ये पूर्ण व अर्थ आयर्नमॕन स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Virarविरार