शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अखंड कार्यक्षमतेचे दुसरे नाव म्हणजे राष्ट्रीय नेते शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 01:04 IST

Sharad Pawar News : अखंड कार्यमग्नतेचे दुसरे नाव म्हणजे शरद पवार. आता जवळपास १८ वर्षे झाली मी त्यांच्यासोबत काम करतोय. पण, इतक्या वर्षांत त्यांच्या सामाजिक अथवा राजकीय कार्यात कधी खंड पडल्याचे मी पाहिलेले नाही.

- माजिद मेमन(माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस )अखंड कार्यमग्नतेचे दुसरे नाव म्हणजे शरद पवार. आता जवळपास १८ वर्षे झाली मी त्यांच्यासोबत काम करतोय. पण, इतक्या वर्षांत त्यांच्या सामाजिक अथवा राजकीय कार्यात कधी खंड पडल्याचे मी पाहिलेले नाही. शरद पवार साहेबांचे वय आता ८० झाले, त्यांची प्रकृती बरी नव्हती. कर्करोगासारख्या असाध्य आजाराशी त्यांनी यशस्वी मुकाबला केला. मध्यंतरी पडल्यामुळे त्यांच्या पायालाही दुखापत झाली होती. परंतु, या सर्व बाबींवर मात करत त्यांचा दिनक्रम ते कायम ठेवतात. अगदी रुग्णालयात असले तरी जी कामे व्हायला हवीत त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा असतो. हा आमच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, पक्षातील तरुण नेत्यांसाठी आदर्श वस्तुपाठच आहे. सकाळी ८ वाजल्यापासून लोकांच्या गाठीभेटींचा त्यांचा दिनक्रम सुरू होतो. प्रत्येकाचे म्हणणे ऎकून घ्यायचे. त्याबाबत जे करणे आवश्यक आहे ते तातडीने मार्गी लावायचे, हा त्यांचा मोठा गुण आहे.शरद पवारांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर सर्व घटकांशी असलेला त्यांचा सुसंवाद, हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मीळ गुण आहे. राजकीय विरोधक, वेगळ्या विचारांच्या, पक्षाच्या लोकांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध असे आहेत की विरोधकही प्रसंगी त्यांच्यासाठी उभे राहतील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांबाबत आदराचेच उद्गार काढले. एनडीए विरुद्ध यूपीएचा इतका संघर्ष मागच्या काळात झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे उद्गार विशेष ठरतात. पवारांचे व्यक्तिमत्त्व, कार्य, त्यांचे चारित्र्यच असे आहे की लोक त्यांच्याभोवती गुंफले जातात. संसदेतही हा गोतावळा आम्ही प्रकर्षाने अनुभवला आहे. राज्यसभेत ते पुढच्या बाकावर आणि मागे आम्ही बसायचो. अनेक वेळा या ना त्या कारणाने सभागृहाचे कामकाज तहकूब व्हायचे.  अशा वेळी डावे, उजवे, मागचे सगळे नेते पवारांच्या आसनाभोवती गोळा व्हायचे. सत्ताधारी बाकांवरील अनेक मंत्रीसुद्धा त्यांच्या आसनापाशी जमत आणि चर्चा झडत. आम्ही पाहायचो की, प्रत्येकाचे प्रश्न सोडवायला एकच माणूस लागतो, ते म्हणजे आमचे पवार साहेब. अशा या आमच्या नेत्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, अशीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस