शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाकीपाड्यातील अंगणवाडी विद्यार्थ्यांचे शिक्षण उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 23:53 IST

सरकारी काम नि बारा महिने थांब अशा तत्त्वाने चालणारे सरकारी कर्मचारी, त्यांचा कारभार सर्वसामान्य जनतेच्या तळपायाची आग मस्तकात नेत आहेच.

पारोळ - सरकारी काम नि बारा महिने थांब अशा तत्त्वाने चालणारे सरकारी कर्मचारी, त्यांचा कारभार सर्वसामान्य जनतेच्या तळपायाची आग मस्तकात नेत आहेच. त्याचा प्रत्यय आता नायगाव पूर्वेतील वाकीपाडा येथे आला आहे. या ठिकाणी अंगणवाडी केंद्राच्या कामाला मागील तीन आठवड्यांपासून सुरुवात झाली आहे. मात्र कामात कोणतीही चपळाई नसल्याने त्याचा फटका लहानग्या विद्यार्थ्यांना बसत आहे.अंगणवाडी केंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने येथील लहानग्या विद्यार्थ्यांना नजीकच्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत.नायगाव पूर्वेकडील वाकीपाडा येथे मुख्य रस्त्यालगत अंगणवाडी केंद्राच्या दुरुस्तीचे काम तीन आठवड्यांपासून संथगतीने सुरू आहे.सदर काम जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील ४० विद्यार्थी सध्या नजीकच्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात उघड्यावर शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून मुलांना साध्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून न दिल्याने मुलांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. अंगणवाडी सेविका आपल्या घरातील पिण्याचे पाणी मुलांना आणून देतात. तर शौचालयासाठी त्यांच्या घरातील बाथरूमचा वापर केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत पालकवर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत काही ना काही कार्यवाही लवकर करण्याची मागणी होते आहे.उघड्यावर कुडकुडत विद्यार्थी घेतात शिक्षणसध्या थंडीचे दिवस असल्याने उघड्यावर कुडकुडत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा वेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडून अंगणवाडी केंद्राचे काम तात्काळ मार्गी लावून लहानग्या विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी पालकवर्गामधून होत आहे.अंगणवाडीसाठी अंगणवाडी सेविकेचे सासरे कै. हरिश्चंद्र विठ्ठल पाटील यांनी आपल्या मालकीची जागा दिली आहे. जागा तर मिळाली, आता या अंगणवाडीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी पालकांची मागणी आहे.

टॅग्स :Educationशिक्षणVasai Virarवसई विरार