जव्हार : तालुक्यातील मोठा मेढा गावातील अंगणवाडीची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बांधकामाच्या निकृष्ट स्थितीमुळे काही महिन्यांपुर्वीच विद्यार्थ्यांचा पट समाज मंदिरामध्ये हलविल्याने जीवित हानी टळली आहे.गावातील अंगणवाडीत ३१ मुलं शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस असल्याने, रविवारच्या रात्री मोठा मेढा गावातील अंगणवाडीची वास्तू कोसळली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जर ही घटना दिवसा घडली असती, तर जीवितास धोक्का निर्माण झाला असता. अंगणवाडीची इमारत धोकादायक आहे. हे शासनाच्या लक्षात यावे म्हणून येथील ग्रामस्थांनी लेखी तक्र ार पंचायत समिती बांधकाम विभाग, जव्हार यांना दोन म्हण्यापूर्वी निवेदन दिले होते. त्यामुळे अंगणवाडीचे स्थलांतर समाज मंदिरात करण्यात आले होते.अंगणवाडीच्या वास्तूसंदर्भात ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना दोन महिन्यापूर्वीच माहिती दिली होती. दरम्यान, अंगणवाडीसाठी नवीन ईमारतीला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मेढा गावातील अंगणवाडी कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:37 IST