वसंत भोईर, वाडातालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पातील १० अंगणवाड्या डिजिटल झाल्या असून सर्व अंगणवाड्या डिजीटल करण्याचा संकल्प प्रकल्प अधिकारी प्रतिभा पष्टे यांनी केला आहे.येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय वाडा २ आहे. कुडूस कोंढले आबिटघर केळठण निंबवली ते पालसई खानिवली गोऱ्हे परिसरातील एकूण २७१ अंगणवाड्या या कार्यालया अंतर्गत चालतात. या सर्व अंगणवाड्यांचे प्रशासन त्यांच्याकडे आहे. गणेशपुरीतील केळठण येथे असलेल्या लर्निग स्पेस फाउंडेशन नितिन ओरायन यांच्याकडे त्यांनी ही कल्पना मांडली. त्यांना ती आवडली. त्यांनी आशिष बिजावर्गी यांच्या सहकार्याने व नीलकमल प्लॅस्टिक या कंपनी कडून अंगणवाडीच्या इमारतीची सजावट करून घेतली. मुंबईतील मुक्तांगण या संस्थेचे या कामी सहकार्य मिळाले. आदिवासी बहुल वस्तीतील ३ ते ६ वयोगटातील गरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील महागडे शिक्षण घेणे शक्य होत नाही. याचा विचार करून आकर्षक व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असलेल्या अंगणवाडीची कल्पना सप्टेंबर्टे यांनी साकारण्याचा प्रयत्न केला. लर्निंग स्पेस फाऊंडेशन या संस्थने सहकार्य केल्याने विभागातील दहा अंगणवाड्या डिजटल झाल्या आहेत. हा उपक्रम २५ अंगणवाड्यातून सुरू आहे.
वाड्यातील अंगणवाड्या डिजिटल
By admin | Updated: April 1, 2017 23:24 IST