शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

ओमान देशात घरकामाकरिता नेवून डांबून ठेवलेल्या भारतीय महिलेस पाच दिवसांत भारतात सुखरूप आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 18:18 IST

ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा व्हिसा आणि पासपोर्ट घेऊन डांबून ठेवले होते.

मंगेश कराळे

नालासोपारा - ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा व्हिसा आणि पासपोर्ट घेऊन डांबून ठेवले होते. याबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यावर आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी योग्य पाठपुरावा करत त्या महिलेची पाच दिवसांत सुखरूप सुटका करून भारतात आणण्यात यश मिळाले आहे. 

वसई कोळीवाड्याचा साईदत्त नगरमध्ये राहणाऱ्या कमलावती पारस वर्मा (५०) यांची मुलगी अंजु वर्मा (३०) ही २५ ऑगस्टमध्ये मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीकरिता गेली होती. परंतु सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असुन तीला तेथे नोकरी करायची नाही. तसेच तिला परत भारतात यायाचे आहे, परंतु तीचा पासपोर्ट व व्हिसा ओमान देशातील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा असुन तो तिला व्हिसा व पासपोर्ट देण्यास नकार देत असुन ती तीन दिवसांपासुन मस्कत, ओमान एअरपोर्ट येथे थांबली असल्याबाबत आईने वसई पोलीस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार अर्जाद्वारे कळविले. सदरचा अर्ज वसई पोलीस ठाणे यांचेकडुन विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना प्राप्त होताच पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेली भारतीय महिला अंजु वर्मा यांच्यासोबत संपर्क केला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजुचा व्हिसा २ वर्षाकरिता वाढविला असुन त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नसल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर पोलिसांनी मस्कत देशातील भारतीय दूतावास यांना ई मेल करून अंजुला मदत करण्याची विनंती करत सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तिला सर्वोतोपरी मदत करण्याची व तिला आश्रय देण्याची विनंती मान्य करून तेथील भारतीय दूतावास यांच्या कार्यालयात पोहचण्यास सांगितले. त्यानुसार भारतीय दूतावासांनी तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करुन सर्व कायदेशिर बाबी पुर्ण करुन तिकडील कायदयाप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रदद केल्याने अंजु ९ जानेवारीला सुखरुप भारतात पोहचली. कमलावती वर्मा यांची मुलगी सुखरुप भारतात परत आल्याने त्यांनी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहेे.

सदरची कामगिरी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक  कुमारगौरव धादवड, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी सोलनकर, महिला पोलीस हवालदार मंजुषा गुप्ता व सिमा दाते यांनी पार पाडली आहे.

टॅग्स :Virarविरार