शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आहेराची धनराशी सैनिक फंडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार : डहाणूतील राजपूत कुटुंबीयांच्या निर्णयाचे स्वागत

अनिरुध्द पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : पुलवामा येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभर हळहळ आणि पाकिस्तानविषयी द्वेष भावना निर्माण झाली. दरम्यान, आपल्या सुख:करीता जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिक परीवारांसाठी मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच देण्याचा निर्णय डहाणू शहरातील सरावली येथल्या अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांच्या या देशप्रेमाविषयी सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राजपूत कुटुंबीय सरावली मानफोडपाडा असून त्यांची थोरली मुलगी भावना (२५) हिचा विवाह सेलवासाच्या कोडिणार गावातील वालजीभाई जेठवा यांच्या इंजिनीयर मुलगा केतुल (२६) यांच्याशी २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे. लगीनघाई सुरू असताना १४ फेब्रुवारी रोजी पुलावामा येथील दहशतवादी हल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. लग्नकार्याच्या तोंडावर हे घडल्याने राजपूत कुटुंबीय हेलावून गेले. समाजात आणि माध्यमांमध्ये शहिद व त्यांच्या कुटुंबियांविषयी ऐकताना मन कष्टी बनायचे असे अशोक राजपूत यांनी सागितले.

आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्या करिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला. 

आहेरांची पाकीटे मुहूर्तावर फोडणार आहोत. किमान दीड लक्ष रूपयांचा आहेर येणे अपेक्षित आहे. जरी २ किंवा ३ लाखांच्या घरात रक्कम गेली, तरीही पै अन पै सैनिकांच्या नावेच जमा केली जाईल.- अशोक राजपूत, वधुचे पिता

डहाणूतील राजपूत कुटुंबियांनी सैनिकांविषयी दाखवलेल्या भावना आदर्शवत आहेत. या शहरातील नागरिक सुजाण असल्याचे हे उत्तम उदाहरण असून त्याचे अनुकरण झाले पाहिजे.- सौरभ कटियार, प्रांत अधिकारी, डहाणू

टॅग्स :SoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान