शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वन अधिकाऱ्याच्या खाजगी वाहनात अंबरदिवा; डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयासमोरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 19:21 IST

अनिरुद्ध पाटील   डहाणू/बोर्डी - डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची MH-05:DS-2452 कार सोमवार, 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ...

अनिरुद्ध पाटील  

डहाणू/बोर्डी - डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची MH-05:DS-2452 कार सोमवार, 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उभी होती. त्यामध्ये चालकाच्या सीट समोर, बाहेरून दिसेल असा अंबर दिवा लावण्यात आला होता. एखादा वन विभागाचा अधिकारी कायद्याचा भंग करून शासकीय नियम पायदळी तुडवत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाईची गरज अधोरेखित होत आहे. तर खुलेआम विकले जाणारे अंबरदिवे हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. 

या कारमध्ये हा अंबरदिवा लावण्यात आला आहे. तर कारच्या मागच्या बाजूस एखाद्या वन अधिकाऱ्याची कॅप ठेवलेली दिसत होती. शासनाने दिलेले अधिकार वैयक्तिक स्वार्थासाठी वापरून वन अधिकारी कायदा पायदळी तुडवत आहेत. नागरिकांना जरब बसावी अशी ही कृती आहे. तर टोल चुकविणे, बिनदिक्कत पार्किंग, ट्राफिक मधून रस्ता मोकळा करून घेण्यासाठी हा फार्मूला सर्रास वापरला जातोच. मात्र या अधिकाऱ्यांनी हे कृत्य का केले हे समजणे तितकेच आवश्यक आहे. या करिता अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु डहाणू उपवन संरक्षक भिसे तसेच डहाणू वन परिक्षेत्र अधिकारी मराठे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून  या अधिकाऱ्यास कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. तर शासकीय वाहनांवर लावणारे अंबरदिवे विकण्याचा धंदा रोखणे हे प्रशासनापुढे आव्हान आहे.

दरम्यान, डहाणू हे पर्यटन स्थळ असून सध्या या हंगामाला प्रारंभ झाला आहे. या काळात परगावतील पर्यटक खाजगी वाहनांवर त्यांच्या शासकीय हुद्यांच्या पाट्या लावतात. अशा बेकायदेशीर कृत्यावर आळा बसावा याकरिता आरटीओ आणि पोलीस विभागाने कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारforest departmentवनविभागRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिसcarकार