शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अंबाडी रोड रेल्वे पुलाला मुहूर्त; दोन महिन्यांपासून होता बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:58 IST

सा.बां.कडून २ कोटींचा निधी येईपर्यंत रेल्वेकडून डागडुजी

नालासोपारा : वसईतील दोन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद असलेला जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी रेल्वेने आता सुरवात केली असून पुलावरील भार काढण्यास शुक्र वार पासून सुरवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या व खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले.

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जूना पूल बंद करण्यात आला होता. तो बंद झाल्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र दोन महिने उलटूनही जुन्या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती न घेतल्याने नागरिकाकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. केवळ एकाच पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होत होती. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडीट न करता धोकादायक कसा काय असा सवाल महापालिकेने करून तो खुला करण्याची मागणी केली होती.

हा जुना पुल सुरू करण्यासंदर्भात वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, महावितरण, खाजगी मोबाईल कंपन्या आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी त्यावरील भार हलका करण्याचा निर्णयÞ घेण्यात आला.

वसईतील जूना अंबाडी पूल रेल्वेने दुरूस्तीसाठी बंद केला आहे. मात्र आता या पुलावर आता बेकादेशीर वाहनतळ सुरू झालेला आहे. पुलाचे काम सुरू होत नाही आणि त्याता आता बेकायदेशीर वाहनतळ सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वसईतील पूर्व व पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूल धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नव्हते. मात्र त्या पुलावर आता बेकायदेशीर पणे सरार्स वाहने पार्किंग होऊ लागली आहेत. वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने कोणीही याठिकाणी वाहन उभे करून निघून जाते.

त्यानुसार जुन्या पूलावरून गेलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या, महावितरणाचे आणि खाजगी मोबाईल कंपन्यांचे केबल्स काढण्याचा निर्णयÞ घेण्यात आला. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या दुरूस्तीचा खर्च दोन कोटी रु पये असून पश्चिम रेल्वेने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा खर्च मागितला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा निधी येईपर्यंत रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.

जूना पूल बंद असल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पूलावर वाहतूक कोंडी होत असते. तर दुसरीकडे जुना पूल दुरूस्त होत नाही आणि तरी देखील बंद ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाला लागूनच पुर्वेकडे स्मशानभूमी असून त्याच्या बाजूला एक गॅरेजवाला आहे. त्याने आपल्या कडे दुरु स्तीसाठी आलेल्या गाड्या सर्रास पणे या पुलावर जाणाºया मार्गावर चढणीवर पार्क केलेल्या आहेत. तसेच पुलाच्या पश्चिम दिशेलाही पंचवटी हॉटेलजवळही पुलावर अनिधकृत रित्या वाहने पार्क होत आहेत.

यावर बोलताना वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात जुन्या पुलावर बेकायदेशीर रित्या पार्किंग करून लोक निघून जातात ही सत्य परिस्थिती आहे. याबाबत आमची कारवाई सुरूच आहे. आमचे पोलीस कर्मचारी त्याठिकाणी असल्यावर कोणीही पार्किंग करीत नाहीत. तसेच अशा प्रकारचे बेकायदा पार्किंग करणारे जर आढळून आले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते.

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरार