शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा आॅनलाइनच्या कामांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 03:47 IST

आॅनलाइनच्या अतिरिक्त कामांचा बोजा शिक्षकांवर लादल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार असल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या कामांवर आजपासून बहिष्कार टाकला आहे.

- हितेंन नाईक।पालघर : आॅनलाइनच्या अतिरिक्त कामांचा बोजा शिक्षकांवर लादल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार असल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या कामांवर आजपासून बहिष्कार टाकला आहे.शासनाने मागील दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळी शालेय कामे आॅनलाइन पद्धतीने करण्यावर भर दिला आहे. साहजिकच ही सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शाळांना पर्यायाने शिक्षकांना भरावी लागते. तसेच या माहितीचे कोणतेही नियोजन नसल्याने देण्यात आलेली माहिती पुन्हापुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने व तातडीने भरावी असे आदेश व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात येतात. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने ग्रामीण भागात इंटरनेट च्या कोणत्याही सुविधा शासनाने पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे शासन पातळी वरून आलेल्या माहितीची पूर्तता या खाजगी व्यक्ती अथवा सायबर कॅफे मधूनच कराव्या लागतात. त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र शिक्षक वर्गाला सहन करावा लागतो. मात्र शिक्षकांचे खरे कार्य हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे हे असून आरटीआय अ‍ॅक्ट २००९ च्या शिक्षण कायद्यानुसारही शिक्षकांनी फक्त अध्यापनाचे काम करणे अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे. मात्र शासन व त्यांचा शिक्षण विभाग मात्र हवे तेव्हा आणि हवे त्या पद्धतीने वेगवेगळी शालेय कामे, अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकावर टाकीत आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या कार्यालयात सेनेचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील,ज्योती ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत, विलास पिंपळे तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समिती अंतर्गत शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघ, प्रा. शिक्षक सेना, प्रा. शिक्षक परिषद, स्वाभिमान शिक्षक संघ, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक संघ, उर्दू प्राथमिक संघटना, कास्ट्रईब शिक्षक संघ यांच्यात झालेल्या चर्चे नंतर हा बहिष्कार घालण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक